Nangre Patil Trying to Trace Up minster | Sarkarnama

विश्‍वास नांगरे- पाटील शोधताहेत महाराष्ट्रात दरोडे टाकणाऱ्यांना नोकरीवर ठेवणारा 'तो' मंत्री 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 25 जून 2019

मुत्थूट फायनान्स या सोनेतारणावर कर्ज देणाऱ्या संस्थेसह बॅंका व एटीएमला लक्ष्य करुन दरेडो टाकणारी टोळी सक्रीय आहे. नाशिकला मुत्थूट फायनान्सवर दरोड्याच्या प्रयत्नात गोळीबारात 'ऑडीटर' ठार झाला. यातील दोन प्रमुख संशयीतांस पोलिसांनी अटक केली. यातून सबंध टोळीचा पर्दाफाश झाला. या टोळीतील सदस्य यापूर्वी उत्तर प्रदेशातील एका मंत्र्याकडे नोकरीस होते. त्यामुळे आता पोलिसांनी तो मंत्री कोण? यावर लक्ष केंद्रीत केले आहे. पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी आज ही माहिती दिली. 

नाशिक : मुत्थूट फायनान्स या सोनेतारणावर कर्ज देणाऱ्या संस्थेसह बॅंका व एटीएमला लक्ष्य करुन दरेडो टाकणारी टोळी सक्रीय आहे. नाशिकला मुत्थूट फायनान्सवर दरोड्याच्या प्रयत्नात गोळीबारात 'ऑडीटर' ठार झाला. यातील दोन प्रमुख संशयीतांस पोलिसांनी अटक केली. यातून सबंध टोळीचा पर्दाफाश झाला. या टोळीतील सदस्य यापूर्वी उत्तर प्रदेशातील एका मंत्र्याकडे नोकरीस होते. त्यामुळे आता पोलिसांनी तो मंत्री कोण? यावर लक्ष केंद्रीत केले आहे. पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी आज ही माहिती दिली. 

आयुक्तांनी यावेळी सशश्‍त्र दरोडेखोर आले असता त्यांच्याशी धडासाने लढा देत त्यांना प्रतिकार करणारे सीसीटिव्ही फुटेजही त्यांनी दाखवले. या फुटेजमध्ये दरोडेखोरांकडे पिस्तुल होते. तरीही त्याची तमा न बाळगता ऑडीटर सॅम्युअल यांनी त्यांना प्रतिकीर करीत बराच वेळ रोखले. यावेळी तेथे पाच ते सात अन्य नागरीक होते. त्यांचे कोणाचेही तेस धाडस झाले नाही. एकटे सॅम्युअल दरोडेखोरांशी झटापट करीत राहिले. त्यात वेळ गेल्याने धोक्‍याचा इशारा देणारा सायरन वाजला. दरोडेखोरांचा सर्व हेतू विफल झाला. त्या रागात त्यांनी अतिशय जवळून सॅम्युअल यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. हे सर्व चित्रण त्यात स्पष्ट दिसत असल्याने ऑडीटर सॅम्युअल यांचे धाडस कौतुकास्पद होते. या पार्श्‍वभूमीवर दरोडाचा अवघड व किचकट तपास लावण्यात यशस्वी झालेल्या सायबर टीम, सहाय्यक पोलिस आयुक्त आर. आर. पाटील आणि पोलिस निरीक्षक आनंद वाघ या तिघांच्या टीमला पोलिस आयुक्तांनी प्रत्येकी सत्तर हजारांचे बक्षीस दिले. या टीमने बक्षीसाची सर्व रक्कम ऑडीटर सॅम्युअल यांच्या कुटुंबीयांना देण्याची विनंती केली. त्यानुसार हा निधी त्यांना दिला जाणार आहे. 

या दरोड्यातील संशयीत परविंदरसिंग याला दोन दिवसांपूर्वी तर प्रत्यक्ष गोळीबार करणारा जितेंद्रसिंग यास पोलिसांनी आज सूरत येथून अटक केली. त्यांच्या टोळीत सात ते आठ जण आहेत. अतिशय नियोजनबध्द पध्दतीने त्यांनी चोरीची वाहने खरेदी करुन सशश्‍त्र दरोडे टाकण्याचे नियोजन केले होते. पश्‍चिम बंगाल, उत्तर प्रदेश येथील हे सराईत होते. त्यांच्यावर यापूर्वीही आठ ते दहा गुन्हे दाखल आहेत. यातील प्रमुख लोक पूर्वी उत्तर प्रदेशातील एका माजी मंत्र्यांकडे नोकरीस असल्याचे आढळले आहे. संशयीतांनाही ते कबूल केले. त्यामुळे महाराष्ट्रात दरोडे टाकणाऱ्यांना नोकरीस ठेवणारा 'तो'मत्री कोण? त्याच्याशी यांचा काय संबंध याबाबत पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील मागावर आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख