Nangre Patil Suspends Two officers From Nashik | Sarkarnama

'खाकी'ला डाग लावणाऱ्या दोन अधिकाऱ्यांचे पोलिसआयुक्त विश्‍वास नांगरे- पाटलांनी केले निलंबन 

सरकारनामा ब्युरो 
गुरुवार, 16 मे 2019

'आऊट ऑफ बॉक्‍स' कामकाजामुळे नेहेमीच चर्चेत राहिलेले विश्‍वास नांगरे- पाटील यांनी नाशिकचे आयुक्त म्हणुन पदभार हाती घेतला आहे. त्याच्या कामाच चुणुक पोलिस यंत्रणेला जाणवु लागली आहे. पोलिसांच्या शिस्तीला बाधा आणत 'खाकी'ला डाग लावणाऱ्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना आठवडाभरात त्यांनी निलंबीत केले आहे. त्यामुळे प्रशासनाने त्यांची चांगलीच धास्ती घेतली आहे. 

नाशिक : 'आऊट ऑफ बॉक्‍स' कामकाजामुळे नेहेमीच चर्चेत राहिलेले विश्‍वास नांगरे- पाटील यांनी नाशिकचे आयुक्त म्हणुन पदभार हाती घेतला आहे. त्याच्या कामाच चुणुक पोलिस यंत्रणेला जाणवु लागली आहे. पोलिसांच्या शिस्तीला बाधा आणत 'खाकी'ला डाग लावणाऱ्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना आठवडाभरात त्यांनी निलंबीत केले आहे. त्यामुळे प्रशासनाने त्यांची चांगलीच धास्ती घेतली आहे. 

नाशिकचे पोलिस आयुक्त म्हणुन पदभार स्विकारतांनाच 'कायद्याच्या चौकटीत राहून कायद्याची अंमलबजावणी करावी. ही शिस्तीची चौकट कोणीही मोडू नये. कर्तव्य बजावतांना चाकोरीबाहेर व बेशीस्तपणा करु नये. खाकीला डाग लावु नये,'" अशा सुचना त्यांनी दिल्या होत्या. त्याचा अनुभव आता प्रशासनाला येऊ लागला आहे. शहरातील पंचवटी पोलीस ठाण्यातील पोलिस निरीक्षक दीपक गिरमे यांनी एका व्यवसायिकाला अनाधिकाराने ताब्यात गेऊन रात्रभर फिरवले. त्याच्याकडे पैशांची मागणी केल्याची तक्रार आली होती. त्याला अन्य काही लोकांनीही सहकार्य केल्याचे उघडकीस आले. त्याबाबत तक्रार येताच चौकशी केल्यावर निरीक्षक गिरमे यांना निलंबीत करण्यात आले. 

गेल्या आठवड्यात शहरातील द्वारका चौकात मध्यरात्री वाद सुरु असल्याचा बिनतारी संदेश मिळाल्यावर तेथे पोहोचलेल्या पोलीस शिपाई सचिन चौधरी याने वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. यावेळी सहाय्यक उपनिरीक्षक चंद्रकांत पळशीकर यांनी चौधरी याच्या कानशीलात भडकावली होती. त्याची तक्रार आल्यावर त्यांची उपायुक्तांमार्फत चौकशी झाली. त्यानंतर पळशीकर यांना तातडीने निलंबीत करण्यात आले. आठवड्याभराच्या कालावधीत दोन अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखविल्याने आयुक्त नांगरे-पाटील चर्चेत आले आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख