nanded zp | Sarkarnama

नांदेड जिल्हापरिषदेच्या अध्यक्षपदी शांताबाई जवळगावकर

जयपाल गायकवाड ः सरकारनामा ब्युरो
सोमवार, 27 मार्च 2017

नांदेड ः जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद म्हणजे मिनी मंत्रालयाचे राज्यमंत्रीच. त्यामुळे या पदाला मोठे महत्त्व असून ते मिळविण्यासाठी सर्वांचाच खटाटोप सुरू असतो. यंदाच्या वर्षी कुणाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडणार याची उत्सुकता मोठ्या प्रमाणावर ताणली गेली होती. विशेष म्हणजे जवळपास चार पाच तरुण महिला स्पर्धेत असताना देखील अखेर 75 वर्षीय शांताबाई पवार - जवळगावकर यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली. जिल्हा गेल्या 55 वर्षाच्या इतिहासात फक्त चार महिलांना अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. 

नांदेड जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष 1962 मध्ये श्‍यामराव कदम झाले होते. त्यानंतर 55 वर्षांत चारच महिलांना अध्यक्षपदाचा मान मिळाला आहे. आतापर्यंत 24 जणांनी परिषदेचे अध्यक्षपद भूषविले आहेत. जिल्हा परिषदेमध्ये पहिली महिला अध्यक्षा बनण्याचा बहुमान शिवसेनेच्या जनाबाई रामजी डुडूळे यांना 1998 मध्ये मिळाला. त्यांचा कार्यकाळ एक वर्षाचा होता. त्यांनतर तब्बल नऊ वर्षांनंतर कॉंग्रेसच्या वैशाली स्वप्नील चव्हाण यांना 2009 मध्ये अध्यक्षपदाची संधी मिळाली. त्यांचा कार्यकाळ दोन वर्ष नऊ महिने असा होता. त्यानंतर पाच वर्षांनी कॉंग्रेसच्याच मंगला आनंद गुंडले यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली त्यांना अध्यक्षपदी अडीच वर्षे राहता आले.

जिल्हा परिषदेच्या यावेळच्या निवडणुकीत अध्यक्षपद महिला खुल्या प्रवर्गासाठी राखीव असल्यामुळे कॉंग्रेसच्या शांताबाई निवृत्तीराव जवळगावकर यांना अध्यक्षपद मिळाले आहे. 
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा वैशाली चव्हाण यांचा मुखेड तालुक्‍यातील सावरगाव (पीर) या गटातून पराभव झाला तर शिवसेनच्या जनाबाई डुडूळे यांचाही किनवट तालुक्‍यातील जलधारा गटातून पराभव झाला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख