कोरोनाशी लढण्यासाठी नांदेडमध्ये शिवसेनेकडून २५ हजार मास्कचे वाटप

कोरोनाचा वाढता प्रादर्भाव रोखण्यासाठी शिवसेनेकडून मोफत मास्क वाटण्याचा उप्रकम हाती घेण्यात आला आहे.
 कोरोनाचा वाढता प्रादर्भाव रोखण्यासाठी शिवसेनेकडून मोफत मास्क वाटण्याचा उप्रकम हाती घेण्यात आला आहे.
कोरोनाचा वाढता प्रादर्भाव रोखण्यासाठी शिवसेनेकडून मोफत मास्क वाटण्याचा उप्रकम हाती घेण्यात आला आहे.

नांदेडः कोरोनाचा वाढता प्रादर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून युध्दपातळीवर प्रयत्न सुरू असतांना नागरिकांमधील भिती नाहीसी करून त्यांना खबरदारीचा उपाय म्हणून शिवसेनेकडून मोफत मास्क वाटण्याचा उप्रकम हाती घेण्यात आला आहे. महाविकास आघाडीचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि राज्य सरकारमधील सगळेच मंत्री झपाटून कामाला लागले आहेत. 

अशावेळी ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या बाळासाहेब ठाकरेंच्या शिकवणीवर चालणारे शिवसैनिक तरी मागे कसे राहतील. नांदेडमध्ये शिवसेनेने नागरिकांना कोरोनाशी लढा देण्यासाठी मोफत मास्कचे वाटप केले.

तरोडा भागातून या उपक्रमाला सुरूवात करण्यात आली असून २५ हजार मास्क वाटण्याचा शिवसेनेचा संकल्प आहे. एकीकडे शिवसेना लोकांच्या मदतीला सरसावली असतांना महापालिकेसह जिल्ह्यातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ताधारी असलेली कॉंग्रेस आणि विरोधक भाजपची नेते मंडळी मात्र सध्या बघ्याची भूमिकेत असल्याचे चित्र आहे.

कोरोनाचे रुग्ण आणि संशयितांची संख्या राज्यात वाढत असतांना जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन सतर्कतेने काम करत आहे. सुदैवाने नांदेडमध्ये एकही रुग्ण आढळला नसला तरी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून प्रयत्न केले जात आहेत. प्रत्येक नागरिक सुरक्षित राहिला पाहिजे, आणि कोरोना संशयितापासून इतरांना धोका होऊ नये यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला आहे.

शिवसेनेच्या वतीने आज नांदेड - उत्तर शहरात सुरक्षा मास्कचे मोफत वाटप करण्यात आले. आमदार बालाजी कल्याणकर, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, उमेश मुंडे, आनंद पाटील बोंढारकर, सहसंपर्कप्रमुख मनोज भंडारी, महानगरप्रमुख अशोक उमरेकर, सचिन टाक, मारुती पवार, विकास देशमुख यांच्यासह शहरप्रमुख सचिन किसवे यांनी हा उपक्रम राबवला.

लवकरच शहरात २५ हजार मास्क वाटप करण्यात येणार असल्याचे आमदार कल्याणकर यांनी सांगितले. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com