nandani nagamma devotees organises yatra during curfew in south solapur taluka
nandani nagamma devotees organises yatra during curfew in south solapur taluka

`यात्रा नको' म्हणणाऱ्या तलाठ्याला दमदाटी करीत नागम्माभक्तांनी यात्रा साजरी केलीच!

नांदणी (ता. दक्षिण सोलापूर) येथील 100 ते 150 ग्रामस्थांनी मिळून तेथील नागम्मा देवीची यात्रा साजरी केली. ही यात्रा झाल्यावर पोलिसांना माहीती समजली आणि 18 जणांना पकडून पोलिसांनी पोलीस ठाण्यात आणले असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे. उर्वरित लोकांचा शोध सुरू आहे.

सोलापूर : कोरोनाचे संकट दूर व्हावे म्हणून सरकारने सर्व मंदिरे, उद्योग,व्यवसाय बंद केले आहेत. सर्वत्र संचारबंदी लागू केली असून पाचपेक्षा अधिक लोक एकत्र जमल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जात आहे. मात्र, नांदणी (ता. दक्षिण सोलापूर) येथील 100 ते 150 ग्रामस्थांनी मिळून तेथील नागम्मा देवीची यात्रा साजरी केली. ही यात्रा झाल्यावर पोलिसांना माहीती समजली आणि 18 जणांना पकडून पोलिसांनी पोलीस ठाण्यात आणले असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे. उर्वरित लोकांचा शोध सुरू आहे.

नवसाला पावणारी देवी म्हणून ओळख असलेल्या नांदणी येथील नागम्मा देवीची यात्रा दरवर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी भरते. मात्र, यंदा कोरोनामुळे संपूर्ण शहर-जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सोलापूर शहरात मागील 12 दिवसांत कोरोना व सारी च्या आजाराचे 50 रुग्ण सापडले असून त्यातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर अक्कलकोट, मोहोळ, दक्षिण व उत्तर सोलापुरात संपूर्ण लॉकडाउन करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला. 

निर्णय होऊन दोन दिवसही झाले नाहीत, तोवर नांदणीतील सुमारे 50 जणांनी एकत्रित येऊन नागम्मा देवीची यात्रा साजरी केली. शनिवारी (ता. 25) पहाटे काही गावकऱ्यांनी चार किलोमीटर पायी जाऊन भीमा नदीत मूर्तीला स्नान घातले. त्यानंतर रविवारी (ता. 26) होमहवन संपन्न झाले. यात्रा संपत असतानाच पोलिसांना याची खबर लागली. 

अटक केलेल्यांवर अंधश्रद्धा निर्मूलन कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्यांचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येत आहे. गावच्या तलाठ्याने फिर्याद दिली आहे. संचारबंदीत यात्रा साजरी करू नका असे सांगूनही नागरिकांनी न ऐकता मला दमदाटी केली, असे तलाठ्याने फिर्यादीत नमूद केले आहे. 

दरम्यान, नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, पोलीस तुमच्या सुरक्षिततेसाठीच रस्त्यांवर आहेत, असे आवाहन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले आहे.

कमालीची गुप्तता पण घात झालाच...
लॉकडाउन असले तरीही नागम्मा देवीची यात्रा करायचीच असे काही जणांनी शुक्रवारी (ता. 24) मध्यरात्री एकत्र येऊन नियोजन ठरवले. त्याची माहीती विश्वासातील काहींनाच देण्यात आली. तर उर्वरित लोकांनी कोणाला काही बोलू नये असे आवाहनही करण्यात आल्याची माहीती गावातील एका व्यक्तीने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितली. 

गावातील एका तरुणाने आठवण म्हणून व्हिडिओ शूटिंग केली आणि तो व्हिडिओ दुसऱ्या मित्रांच्या व्हाट्स अपग्रुपला पाठवला. पाहता पाहता तो व्हिडिओ पोलिसांपर्यंत गेला. त्यानंतर गावच्या तलाठ्याने मंद्रुप पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलीसांनी 50 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करायला सुरुवात केली असून त्यापैकी 18 जणांना पकडले आहे. उद्या (ता. 27) त्यांना अक्कलकोट न्यायालयात हजर केले जाईल, असे पोलीस उपअधीक्षक प्रभाकर शिंदे यांनी सांगितले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com