नंदा लोणकर यांच्याकडे चकरा मारून राष्ट्रवादीचे पदाधिकारी वैतागले

नंदा लोणकर यांच्याकडे चकरा मारून राष्ट्रवादीचे पदाधिकारी वैतागले

....

पुणे : आपल्या वाटेचे महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपद दिपाली धुमाळी यांच्या पदरात पडल्याने नाराज झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका नंदा लोणकर आता वरिष्ठ पक्ष नेतृत्व आणि स्थानिक नेत्यांबाबत आक्रमक पवित्रा घेतला.

नव्या पक्षनेत्या दिपाली धुमाळी यांच्या निवडीच्या शहराध्यक्षांच्या पत्रावर "सही' करण्यासाठी नंदाताई अद्याप तयार झालेल्या नाहीत. तेवढेच नाही, तर त्यांची सही घेण्यासाठी येरझाऱ्या मारणाऱ्यांना त्या सापडेनाशाही झाल्या आहेत. त्याचवेळी त्यांचा मोबाईलही "नॉट रिचेबल' असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे नंदाताईंची नाराजी दूर करण्यासाठी हे पद त्यांच्याकडेच जावे, यासाठी आग्रही असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार की, नंदाताईंना हे पद मिळणार नाही, याचा बंदोबस्त केलेले खासदार सुनील तटकरे पुढाकार घेणार, याची उत्सुकता आहे.

महापौर, स्थायी समिती अध्यक्षपदाची संधी हुकल्यानंतर विरोधी पक्षनेतेपदासाठी प्रचंड मोठी "फिल्डिंग' लावलेल्या नंदाताईंना हे पद मिळाले नाही आणि त्यांच्याजागी दिपाली धुमाळ यांची निवड करण्यात आली. त्यानुसार पक्षाच्या सर्व नगरसेवकांचा पाठिंबा असलेले पत्र विभागीय आयुक्तांना देऊन धुमाळी यांची अधिकृत निवड केली जाणार आहे. त्यासाठी निवडणूक होणार आहे. परंतु, दिपाली धुमाळांच्या निवडीने नंदाताई नाराज झाल्या असून, आपल्यावरील अन्यायाचा पाढा वाचत आहेत. दुसरीकडे, अजितदादांचा निर्णय मान्य असल्याच्या त्या उघडपणे सांगत आहे. परंतु, काही केल्या त्यांच्यातील नंदाताईंमधील नाराजी लपू शकलेली नाही.

त्यांच्या नाराजीची जखम भळभळत असतानाच नव्या नेत्यांच्या निवडीली सहमती देण्याचे पत्र शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी काढले आहे. त्यावर नगरसेवकांनी सही करण्याचे फर्मानही त्यांनी सोडले. त्यानुसारचा पक्षाचा आदेश पाळत राष्ट्रवादीच्या बहुतेक नगरसेवकांनी सह्या केल्या. मात्र, हे पत्र घरी येऊनही नंदाताईंनी अजून तरी सही केलेली नाही. पत्रावर सही घेण्यासाठी धुमाळ यांच्यासह पक्षातील अनेकजण नंदाताईंच्या घरी आणि ऑफिसमध्ये चकरा मारत आहेत. काहीवेळा तर त्यांचा मोबाईल नॉटरिचेबल' आहे. मात्र, पक्षश्रेष्ठींवर नाराज असलेल्या प्रत्यक्षात कोणाला भेटत नसल्या तरी, प्रभागातील सर्वच कार्यक्रमांत त्या दिसत आहेत. परंतु, त्या नेमक्‍या व्यक्तीलाच भेटत नसल्याने नंदाताईंनी काय ठरविले आहे, याचे कोडे सुटेनासे झाले आहे. 

दरम्यान, पक्षातील काही ज्येष्ठ नगरसेवकांनी नंदाताईंची समजूतही काढल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, त्याचाही परिणाम न झाल्याने स्वत: अजितदादाच त्यासाठी पुढाकार घेतील, असेही नगरसेवक सांगत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com