नागपुरच्या महापौरांना लागले बंगल्याचे वेध, जागेची शोधाशोध सुरू

नागपुरच्या महापौरांना लागले बंगल्याचे वेध, जागेची शोधाशोध सुरू

नागपूर : जिल्हा परिषद अध्यक्षांप्रमाणे महापौरांना शासकीय बंगला हवा आहे. महापौर नंदा जिचकार यांनी सदर येथील नियोजन भवनाजवळील जागेची मागणी केली असून, बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांकडून मिळाली. उच्चपदस्थ लोकप्रतिनिधींना शासकीय बंगला आहे. नागपूर जिल्ह्यात जिल्हा परिषद अध्यक्षासाठीही सिव्हिल लाइन्स येथे बंगला आहे. नागपूर महानगरपालिकेला शासनाने "अ' वर्गाचा दर्जा दिला असून, राज्यमंत्र्यांचा दर्जा आहे. असे असतानाही महापौरांना शासकीय बंगला नाही. 

महापौरांच्या बंगल्यासाठी एक जागा आरक्षित ठेवली होती. मात्र, महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे ती जागा गमवावी लागली. आता महापौर नंदा जिचकार बंगल्यासाठी आग्रही आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत त्यांनी चर्चा केली. सदर येथील जुने पंचायत समिती कार्यालय येथे जिल्हा नियोजन भवन तयार करण्यात येत आहे. या भवनाच्या बाजूला कौटुंबिक न्यायालयाच्या इमारतीचे बांधकाम प्रस्तावित आहे. येथे एक मोठा भूखंड मोकळा आहे. हा भूखंड महापौर बंगल्यास देण्यासाठी नंदा जिचकार यांनी चर्चा केली. मिळालेल्या माहितीनुसार, याबाबत कोणत्याही प्रकारचा लेखी प्रस्ताव बांधकाम विभागाकडे आला नाही. कौटुंबिक न्यायालयाला जागेची आवश्‍यकता भासणार आहे. त्यामुळे त्यांच्याकडून मंजुरी मिळाल्याशिवाय कोणतीही कार्यवाही होणार नसल्याचे सांगण्यात येते. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com