शिवसेनेच्या विरोधामुळे नाणार प्रकल्प महाराष्ट्रातून हद्दपार होण्याची चिन्हे

शिवसेनेच्या विरोधामुळे नाणार प्रकल्प महाराष्ट्रातून हद्दपार होण्याची चिन्हे

रत्नागिरी : वादग्रस्त नाणार रिफायनरी प्रकल्प आता राज्यातूनच बाहेर होण्याची शक्‍यता असून तो गुजरातमध्ये नेण्याच्या हालचाली सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राज्य शासनाने ऑगस्ट अखेरपर्यंत रिफायनरीसाठी जमीन उपलब्ध करून न दिल्यास गुजरातच्या दिशेने जाऊ, अशी डेडलाईन रिफायनरीच्या व्यवस्थापनाने  दिल्याने रिफायनरी कोकणातून हद्दपार होणार,असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. दरम्यान, रिफायनरीच्या सूत्रांनी किंवा राज्य शासनाच्यावतीने लागलीच काही भाष्य करण्यात आलेले नाही.

मुख्यत: शिवसेनेचा नाणार रिफायनरी प्रकल्पाला मोठा विरोध होता. इतर स्थानिक राजकीय नेत्यांनीही नाणार रिफायनरीला विरोध दर्शविला. त्यानंतर फडणवीस सरकारने रिफायनरी प्रकल्प रत्नागिरीतून हद्दपार करण्याचा निर्णय जाहीर केला. हा महत्वाकांक्षी प्रकल्प रायगड जिल्यातील प्रस्तावित तिसरी मुंबई रोहा, मुरूड, अलिबाग समावेश तालुक्‍यांत उभारण्याची शक्‍यता निर्माण झाली होती.

रोहा, मुरूड, अलिबाग सीमारेषेवर तिसरी मुंबई वसवण्याचे राज्य शासन, सिडकोचे नियोजन आहे. तसेच औद्योगिकरणासाठी तब्बल 20 हजार हेक्‍टर जमीन संपादित आहे. काही जमिनीवर सिडकोचे प्रकल्प होण्याचे स्पष्ट संकेत आहेत.

रायगडात शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना, आदिवासी संघटनांचा प्रखर विरोध नाकारता येणार नाही. याच चर्चेत रिफायनरी प्रकल्पाला रायगड जिल्हयात ऑगस्ट अखेर जमिन उपलब्ध करून न दिल्यास प्रकल्प गुजरातला घेऊन जाऊ, असे सूतोवाच गुरूवारी रिफायनरीच्या सुप्रिम व्यवस्थापनाने केल्याचे समोर आले.

 
तसे प्रयत्न थेट केंद्र सरकारचे असल्याच्या वृत्तालाही दूजोरा मिळत आहे. रत्नागिरीतून हद्दपार झालेला रिफायनरी प्रकल्प रायगडातील चणेरा विभागात प्रस्तावित होण्याच्या शक्‍यतेला शासनाचा अप्रत्यक्ष दूजोरा मिळाला होता. तशी चर्चा सबंध रायगडात सुरू होती. तरीही रिफायनरी प्रकल्पाबाबत ठोस निर्णय नव्हते. याच शक्‍यतेच्या आधीच रिफायनरी गुजरातकडे सरकण्याचे संकेत मिळत आहेत.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com