नाणारविरोधकांची समजूत काढू : मुख्यमंत्री 

नाणारविरोधकांची समजूत काढू : मुख्यमंत्री 

मुंबई : सरकारची भूमिका संघर्षाची नसून संवादाची आहे, असे स्पष्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणार होणार असल्याचे संकेत आज पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत दिले. कोकणातील नाणार रिफायनरीला विरोध करणाऱ्यांचे चर्चेतून गैरसमज दूर करू, असे फडणवीस यांनी सांगितले. 


पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक बोर्डाने आयोजित केलेल्या "गॅस डिस्ट्रीबुशन सेंटर"च्या निविद प्रक्रियेच्या समारंभासाठी ते येथे आले होते, या वेळी आयोजित रोड शो दरम्यान फडणवीस यांनी "नाणार"वर भाष्य केले. नाणार प्रकल्प राज्यात येणे भाग्याचे असल्याचे त्यांनी सांगितले. 

या प्रकल्पामुळे रोजगारनिर्मिती होणार असल्याचे त्यांनी सांगितले. नाणार प्रकल्पाला शिवसेनेने कडाडून विरोध केला आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान यांची भेट नाकारल्यानंतर दोन्ही पक्षांमधील तणाव वाढला आहे. नाणारला विरोध करणाऱ्यांचे गैरसमज दूर केले जातील. उद्धव ठाकरे यांनी आज भेट नाकारली असली तरी पुन्हा त्यांची भेट घेऊन नाणारचे महत्त्व त्यांना पटवून देऊ, असे प्रधान यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com