nana shayamkule mla bjp | Sarkarnama

आजचा वाढदिवस : नाना शामकुळे, आमदार, भाजप - चंद्रपूर

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 22 जून 2018

दलित चळवळ व रिपब्लिकन पक्षातून राजकीय कारकीर्द सुरू करणारे नाना शामकुळे एक अभ्यासू नेते म्हणून नागपुरात ओळखले जातात. नागपूर महापालिकेत 1985 मध्ये पहिल्यांदा खोरिपचे नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या नाना शामकुळे यांनी शहरातील अनेक प्रश्‍न धसास लावण्यासाठी सभागृहात आवाज उठविला होता. नागपूर महापालिकेत विरोधी पक्षनेता म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली. 2004 नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2009 मध्ये त्यांना अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून त्यांना भाजपची उमेदवारी देण्यात आली. तेथून ते निवडून आले. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी हा गड कायम राखला.

दलित चळवळ व रिपब्लिकन पक्षातून राजकीय कारकीर्द सुरू करणारे नाना शामकुळे एक अभ्यासू नेते म्हणून नागपुरात ओळखले जातात. नागपूर महापालिकेत 1985 मध्ये पहिल्यांदा खोरिपचे नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या नाना शामकुळे यांनी शहरातील अनेक प्रश्‍न धसास लावण्यासाठी सभागृहात आवाज उठविला होता. नागपूर महापालिकेत विरोधी पक्षनेता म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली. 2004 नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2009 मध्ये त्यांना अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून त्यांना भाजपची उमेदवारी देण्यात आली. तेथून ते निवडून आले. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी हा गड कायम राखला. एक अभ्यासू आमदार म्हणून ते ओळखले जातात. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख