गिरीश तुला बाहेर जायचे का?, असे पटोलेंनी विचारतच महाजन शांत झाले

....
girish mahajan copy
girish mahajan copy

मुंबई : विधीमंडळात 'सीएए'च्या मुद्यावरून सत्ताधारी-विरोधकांत रणकंदन माजल्यानंतर सत्ताधारी-विरोधकांवर संतापलेल्या विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेंनी गोंधळ घालणाऱ्या आमदारांना सभागृहाबाहेर काढण्याचा दम भरला; तरीही बाकावर बसून टिप्पणी करणाऱ्या माजी मंत्री गिरीश महाजनांवर पटोले घसरले आणि 'गिरीश तुला बाहेर जायचे का?' काढू का? असे विचारत शांत राहण्याचा सल्ला दिला. पटोलेंच्या या पवित्र्यानंतर मात्र काही मिनिटे का होईना पण सभागृहात शांत राहिले.

माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणादरम्यान झालेले गोंधळ वाढला तो माजी मंत्री सुधीर मुनगंटीवारांच्या भाषणापासून. मुनगंटीवारांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि मंत्री नवाब मलिक यांच्या नावांचा उल्लेख केल्याने सत्ताधारी पक्षाचे विशेषतः राष्ट्रवादीचे मंत्री, आमदार आक्रमक झाले आणि जोरजोरात आक्षेप घेऊ लागले.

तेवढ्यात विरोधी भाजपचेही आमदार समोरासमोर आल्याने सभागृहात प्रचंड गोंधळ उडाला. आमदार आपल्या जागेत बसावे, शांत रहावे, अशा सूचना पटोले वारंवार करीत होते; तरीही सगळीच गोंधळ घालत अनेकमेकांना आव्हान-प्रतिआव्हान देत होते. त्यानंतर आपल्या जागेत उभे राहन पटोले म्हणाले, "आता हे मी खपवून घेणार नाही. बोलणाऱ्या (गोंधळ घालणाऱ्या) आमदारांनी बाहेर काढेल," असा इशारा पटोलेंनी दिला. तेवढ्यात पटोलेंच्या पुढच्या बाकांवर बसलेले गिरीश महाजन काही तरी बोलत होते आणि तेव्हाच महाजनांकडे नजर वळून गिरीश तुला बाहेर जायचे का? काढू का,' असा दमच पटोलेंनी महाजनांना भरला. त्यानंतर मात्र काहीसे शांत झालेल्या सभागृहात पुन्हा आरोप-प्रत्यारोपाने गोंधळ झाला. त्यावर अर्ध्या तासासाठी कामकाज थांबविण्याचा निर्णय घेत पटोले आपल्या दालनात गेले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com