राज्यात ब्रह्मा-विष्णू-महेशाचे सरकार :  नाना पटोले 

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त पुरस्कार वितरण सोहळ्यात पटोले अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
Balasaheb-Thorat-felicitated
Balasaheb-Thorat-felicitated

संगमनेर :  "सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या विचारांचा प्रभाव असलेले महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, संयमी व शांत स्वभावामुळे सर्वांना एकत्र आणण्यात यशस्वी ठरले आहेत. हे तीन पक्षांचे नव्हे तर ब्रह्मा-विष्णू-महेशांचे सरकार आहे. या सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करून ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. मी विधानसभा अध्यक्ष म्हणून काम करताना, जनतेचा प्रतिनिधी म्हणून जनतेची कामे सरकारकडून करून घेणार आहे,'' अशी ग्वाही विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.


सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त पुरस्कार वितरण सोहळ्यात पटोले अध्यक्षस्थानावरून बोलत होते.


पटोले म्हणाले, " राजकारणातील आक्रमक व्यक्तिमत्व म्हणून माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन असला, तरी मी जनतेचा प्रतिनिधी आहे. विधानसभेचा अध्यक्ष या नात्याने सत्ताधारी व विरोधकांकडून जनतेच्या हिताची कामे करून घेण्याला माझे प्राधान्य राहील. हे सरकार जनतेच्या विश्वासाला निश्‍चित पात्र ठरून, पाच वर्षे सत्तेत राहणार आहे,'' असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.


राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व डॉ. अण्णासाहेब शिंदे यांनी केलेल्या रचनात्मक व दिशादर्शक कामामुळे नगरचे नाव देशपातळीवर गेल्याचे गौरवोद्‌गार काढले. शेतीप्रधान देशातील नागरिकांच्या हिताचे नियम व कायदे बनविण्यासाठी विधानसभा व लोकसभेत शेतकऱ्यांची मुले गेली पाहिजेत. नम्रता व जनमानसाच्या हृदयातील स्थान थोरातांच्या यशाचे गमक असून, तरुण राजकारण्यांसाठी दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.


अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेतर्फे सहकार, साहित्य, समाजसेवा, पर्यावरण या क्षेत्रांत उल्लेखनीय कार्याबद्दल पत्रकार राजीव खांडेकर, पर्यावरणतज्ज्ञ डॉ. गिरीश गांधी यांना आणि सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार सत्यशील व योगीता शेरकर यांना प्रदान करण्यात आला.

माजी केंद्रीयमंत्री विजय नवल पाटील, आमदार डॉ. सुधीर तांबे, लहू कानडे, डॉ. किरण लहामटे व हिरामण खोसकर, माजी आमदार मोहन जोशी, कल्याण काळे, उद्योजक राजेश मालपाणी आदी उपस्थित होते. बाळासाहेब थोरात यांनी प्रास्ताविक केले. नामदेव कहांडळ यांनी सूत्रसंचालन केले. ऍड. माधवराव कानवडे यांनी आभार मानले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com