राज्याच्या उन्नतीसाठी नाना पटोलेंचे रेणुका देवीला साकडे

रेणुका देवीचेदर्शन घेतल्यानंतर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी माहूर येथील विश्रामगृहावर आढावा बैठक घेतली.
Nana-Patole-at-Mahur-temple
Nana-Patole-at-Mahur-temple

महागाव, (जि. यवतमाळ)  : राज्याची उन्नती व्हावी, प्रगती व्हावी, यासाठी आई रेणुकेला साकडे घालायला आलो आहे. शेतकरी आत्महत्या या महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही. त्या थांबल्या पाहिजेत, असं मागणंच यावेळी आई रेणुकेला मागितल्याचे किसान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकारांना सांगितले.

पटोले व पवार कुटुंबीयांनी आज (शुक्रवारी) सकाळी आठला संयुक्तपणे नांदेड जिल्ह्यातील माहुरगड येथे माँ रेणुकेचे दर्शन घेतले. यावेळी श्री. पटोले पत्रकारांशी बोलत होते.


विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रथमच नाना पटोले यांनी शुक्रवारी सहकुटुंब माहुरगड येथे जाऊन रेणुका देवीचे  दर्शन घेतले. पटोले कुटुंबीयांनी अभिषेक करून रेणुका देवीची  ओटी भरली व आरती केली. चंदुकाका भोपी व शुभम भोपी यांनी पौरोहित्य केले.

त्यांच्यासोबत पत्नी सौ. मंगला व मुली नीता आणि प्रिया, तसेच त्यांचे बहीण जावई सेवानिवृत्त पोलिस अधिकारी किरण धोटे व त्यांची बहीण शीलाताई धोटे, तसेच किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देवानंद पवार, त्यांच्या पत्नी सौ. चेतना, मुले आदेश व सिद्धांत, तसेच त्यांचे बंधू साहेबराव पवार, सौ. अरुणा पवार, त्यांची मुले अवनी व अर्णव आदींची उपस्थिती होती.


 राज्य पणन महासंघाचे उपाध्यक्ष नामदेवराव पेशवे, नगराध्यक्ष शीतल जाधव, माजी नगराध्यक्ष राजेंद्र केशवे, किनवट तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संजय राठोड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप मुनगिनवार, शहराध्यक्ष आनंद पाटील तुपडाळे, माजी उपनगराध्यक्ष मुनाफभाई, नगरसेवक इलियास बावाणी आदींची उपस्थिती होती. माहुरचे उपविभागीय अधिकारी अभिनव गोयल, तहसीलदार सिद्धेश्‍वर वरणगावकर, किनवटचे तहसीलदार नरेंद्र देशमुख आदी यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी माहूर देवस्थानतर्फे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचा शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन मंदिराचे विश्‍वस्त चंदुकाका भोपी यांनी सन्मान केला.


रेणुका देवीचे  दर्शन घेतल्यानंतर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी माहूर येथील विश्रामगृहावर आढावा बैठक घेतली. या बैठकीत शेतकर्‍यांसह नागरिकांनी विविध प्रश्‍न उपस्थित केले. त्या सर्व प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी 27 जानेवारीला पटोले यांनी आपल्या कक्षात मुंबईला तातडीची बैठक लावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com