ओबीसी समाजाच्या पाठीशी : नाना पटोले 

ओबीसींचा हा प्रश्‍न निकाली काढण्याकरिता सहकार्य करू
 nana patole on obc community
nana patole on obc community

ठाणे: राज्यातील ओबीसी समाजाच्या अडचणी मला अवगत आहेत. आरक्षणाची टक्केवारी, शिष्यवृत्ती मंजुरीस होणारा विलंब, जनगणनेत ओबीसींच्या कॉलमचा अभाव या अनेक मुद्द्यांवर आपण वेळोवेळी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला आहे. आपण ओबीसी समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असे आश्‍वासन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. 

महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस ओबीसी विभागाचे अध्यक्ष प्रमोद मोरे यांच्या नेतृत्वात राज्यभरातून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी विधान भवनात नाना पटोले यांची भेट घेतली. 

यावेळी पदाधिकाऱ्यांनी पटोले यांच्याशी ओबीसी समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्‍नांवर, केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधी भूमिकेबाबत सविस्तर चर्चा केली. तत्पूर्वी ओबीसी प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्षांची बैठक पक्षाच्या मुंबई येथील टिळक भवन दादर येथील मुख्यालयात प्रमोद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यात केंद्र सरकारच्या ओबीसी आरक्षणविरोधी भूमिकेबद्दल जिल्ह्या-जिल्ह्यात घेण्यात आलेल्या आंदोलनांचा आढावा घेण्यात आला. 

बैठकीनंतर शिष्टमंडळाने महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन राज्यभरात घेण्यात आलेल्या आंदोलनाचा अहवाल सुपूर्द केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com