nana patole mp | Sarkarnama

नोव्हेंबरमध्ये मराठ्यांना आरक्षण ही लोणकढी थाप - नाना पटोले

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

नागपूर : येत्या नोव्हेंबर महिन्यात मराठ्यांना आरक्षण लागू करण्यात येईल, ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लोणकढी थाप आहे, अशा शब्दात कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार नाना पटोले यांनी टीका केली आहे. मराठ्यांना आरक्षण देण्याच्या तरतुदींची पूर्तता येत्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. 

"सरकारनामा'शी बोलताना नाना पटोले म्हणाले, मराठा आरक्षणासाठी मुंबईत मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी तीन महिन्यात मराठा आरक्षणाचा प्रश्‍न सोडवू, असे आश्‍वासन दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या या आश्‍वासनाचे पुढे काय झाले? हे कळले नाही. आता मराठा आंदोलकांमध्ये उद्रेक निर्माण झाल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात आरक्षणाची तरतूद करण्यात येईल, असे सांगून वेळ मारून नेण्याचा हा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न आहे. मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी राज्यघटनेत तरतूद करण्याची आवश्‍यकता आहे. ही घटनादुरुस्ती संसदेतमध्ये होण्याची इतक्‍यात शक्‍यता वाटत नाही. संसदेचे सध्या सुरू असलेले पावसाळी अधिवेशन येत्या 10 ऑगस्टला संपणार आहे. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये हिवाळी अधिवेशनाला सुरूवात होईल. मग मराठ्यांना आरक्षण देण्याची तरतूद करणारी घटना दुरुस्ती केव्हा होणार आहे, हे समजण्या पलिकडे आहे. 

मराठा आरक्षणाचा मुद्दा समोर करून मुख्यमंत्र्यांनी राज्यात होऊ घातलेल्या मेगा भरतीवर बंदी आणली आहे. या दोन्ही प्रश्‍नाचा कुठे काही संबंध नसताना बहुजनांच्या वाट्याला येऊ घातलेल्या काही नोकऱ्याही या निर्णयाने हिरावल्या आहेत. यातून साध्य काहीही होणार नाही परंतु मराठा व बहुजन असा वाद पेटण्याची शक्‍यता आहे. हे मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रात हवे आहे काय? असा सवाल पटोले यांनी केला. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख