विधानसभा अध्यक्षपदी नाना पटोले बिनविरोध 

 विधानसभा अध्यक्षपदी नाना पटोले बिनविरोध 

पुणे : गुप्त मतदानाने होणारी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक खुल्या पद्धतीने घेण्याची महाराष्ट्र विकास आघाडीची रणनिती होती मात्र आज तसे चित्र पाहण्यास मिळाले नाही. नाना पटोले यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. भाजपचे उमेदवार किसन कथोरे यांनी माघार घेतली आहे. 

कालच उद्धव ठाकरे यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला होता. आज अध्यक्षपदाची निवडणूक गुप्त मतदानाने होईल असे वाटत होते मात्र तसे झाले नाही. हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी विनंती केली. विरोधकांना चहापानासाठी बोलविण्यात आले होते. 

आज विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध म्हणून नाना पटोल निवडून आले आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com