खरंच किती डीव्हीआर चोरी गेले? : नाना पटोले यांची विचारणा 

एकच डीव्हीआर चोरी गेल्याची तक्रार असताना जिल्हाधिकारी यांनी दोन डीव्हीआर चोरीला गेल्याचा दावा केला आहे. त्यांनी याबाबत पुन्हा विचार करावा आणि नेमके किती डीव्हीआर चोरी गेले ते सांगावे, अशी मागणी माजी खासदार व नागपूर लोकसभेचे कॉंग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी केली.
खरंच किती डीव्हीआर चोरी गेले? : नाना पटोले यांची विचारणा 

नागपूर : एकच डीव्हीआर चोरी गेल्याची तक्रार असताना जिल्हाधिकारी यांनी दोन डीव्हीआर चोरीला गेल्याचा दावा केला आहे. त्यांनी याबाबत पुन्हा विचार करावा आणि नेमके किती डीव्हीआर चोरी गेले ते सांगावे, अशी मागणी माजी खासदार व नागपूर लोकसभेचे कॉंग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी केली. 

पटोले म्हणाले, ''उमरेडच्या स्ट्रॉंग रुममधून डीव्हीआर चोरी गेल्याचा आधी प्रशासनाने नकार दिला होता. आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. एकच डीव्हीआर चोरी गेल्याचे एफआयआरमध्ये म्हटले आहे. निवडणूक आयोगाची चमू तपासणीला येण्याच्या आदल्या रात्री चोरट्यांनी दोन डीव्हीआर स्ट्रॅंग रुमच्या प्रवेशद्वारावर आणून सोडले. एकाची चोरी झाली असताना दुसरा डीव्हीआर कुठून आला असा सवाल उपस्थित झाला होता. या सर्व घडामोडी संशायस्पद वाटतात. गुरुवारी जिल्हाधिकारी अश्‍वीन मुद्‌गल यांनी दोन डीव्हीआर चोरी गेल्याचे प्रसारमाध्यमांना सांगितले." त्यामुळे दुसऱ्या डीव्हीआरमध्ये काय आहे, तो कुठून आला, खरच चोरी गेला होता का? याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे. 

''नागपूरच्या स्ट्रॅंगरुमधील सीसीटीव्ही बंद आहेत असा आक्षेप आम्ही घेतला, तेव्हाही जिल्हाधिकारी यांनी तो फेटाळून लावला होता. आम्ही न्यायालयात गेलो तेव्हा त्यांनी ते बंद असल्याचे कबुल केले. त्याचा रेकॉर्डही उपलब्ध नसल्याने न्यायालयाला सांगितले. त्यामुळे उमरेडच्या चोरीला गेलेल्या डीव्हीआरबाबत त्यांनी दिलेल्या माहितीवर विश्‍वास कसा ठेवायचा,'' असेही पटोले म्हणाले. ''नागपूर आणि रामटेक लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेत सर्वाधिक गोंधळ आहे. कर्मचाऱ्यांना मतदानासाठी बॅलेट देण्यात आले नाही. मतदारांपर्यंत ओळखपत्र पोहचविण्यात आले नाही. मतदान केंद्राच्या ठिकाणी प्रशासनातर्फे बुथ लाऊन मतदार ओळखपत्रांचे वाटप केले होते. भर उन्हात मतदारांना दोन वेळा रांगेत उभे केले. निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या संहितेचा भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी,'' अशी मागणी नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com