जुमलेबाज भाजप सरकारचा पर्दाफाश करू - नाना पटोले

जुमलेबाज भाजप सरकारचा पर्दाफाश करू - नाना पटोले

नागपूर : केवळ जुमलेबाजी करून शेतकरी व शेतमजुरांची फसवणूक करणाऱ्या मोदी सरकारच्या धोरणाचा पर्दाफाश करणार असल्याचे किसान खेत-मजदूर कॉंग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. 

किसान खेत-मजदूर कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर "सरकारनामा'शी बोलताना नाना पटोले यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे आभार मानले. शेतकरी व शेतमजुरांचे प्रश्‍न घेऊन मी राजकारण केले आहे. याच मुद्यावरून भाजपचा राजीनामा दिला होता. माझ्या आवडीच्या क्षेत्राची जबाबदारी पक्षाने माझ्यावर सोपविली आहे. याचा मला आनंद असल्याचे ते म्हणाले. 

मोदी सरकार सत्तेत आल्यापासून शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला दीडपट हमी भाव देण्याची घोषणा अंमलात आली नाही. राज्य सरकारची कर्जमाफीची घोषणा फोल ठरली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष आहे. भाजपने निवडणुकीपूर्वी दिलेले आश्‍वासने "जुमले' होते, असे भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी आधीच स्पष्ट केले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे या सरकारकडून भले होणार नाही, हे स्पष्ट असल्याने आपण भाजपला रामराम ठोकला होता. आता कॉंग्रेस पक्षाने या क्षेत्राची जबाबदारी दिल्याने सर्व देशभर आपण फिरून या जुमलेबाज सरकारचा धोरणाचा पर्दाफाश करू. तसेच शेतकरी, शेतमजुरांना कॉंग्रेससोबत जोडण्यासाठी यापुढे प्रयत्न करू, असेही पटोले यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com