केजमधून नमिता मुंदडांना भाजपची उमेदवारी? संगिता ठोंबरेंच्या भूमीकेकडे लक्ष

राष्ट्रवादी काँग्रेसने केज मतदार संघातून उमेदवारी जाहीर केलेल्या नमिता अक्षय मुंदडा या आता भाजपच्या उमेदवार असणार आहेत. त्यांचा भाजप प्रवेश आणि उमेदवारीची घोषणा लवकरच होणार आहे. एकीकडे पक्षातील आमदार सोडून जात असताना आता पक्षांतर्गत कुरघोड्यांमुळे खुद्द पवारांनी जाहीर केलेला उमेदवारही पक्षातून जाणे हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
Sangita Thombare - Namita Mundada
Sangita Thombare - Namita Mundada

बीड  : राष्ट्रवादी काँग्रेसने केज मतदार संघातून उमेदवारी जाहीर केलेल्या नमिता अक्षय मुंदडा या आता भाजपच्या उमेदवार असणार आहेत. त्यांचा भाजप प्रवेश आणि उमेदवारीची घोषणा लवकरच होणार आहे. एकीकडे पक्षातील आमदार सोडून जात असताना आता पक्षांतर्गत कुरघोड्यांमुळे खुद्द पवारांनी जाहीर केलेला उमेदवारही पक्षातून जाणे हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

दिवंगत लोकनेत्या डॉ. विमलताई मुंदडा यांनी सलग पाच वेळा केज मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले. दिवंगत मुंदडा यांनी आपली राजकीय सुरुवात भाजपमधून केली. त्या दोन वेळा भाजप तर तीन वेळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडुण आल्या. नऊ वर्षे त्यांनी विविध खात्यांचे मंत्रीपदही सांभाळले. दरम्यान, मागच्या निवडणुकीत त्यांच्या सुन नमिता मुंदडा यांचा भाजपच्या संगीता ठोंबरे यांच्याकडून पराभव झाला होता. परंतु, पराभवाच्या दुसऱ्या दिवशीपासून मुंदडा कुटूंबियांची या निवडणुकीसाठी तयारी सुरु होती. परंतु, मतदार संघातील पक्षांतर्गत गटबाजीमुळे मुंदडांची राजकीय गळचेपी होत असे. पक्षांतर्गत कुरघोड्यांच्या तक्रारी पक्षांच्या वरिष्ठांपर्यंतही गेल्या होत्या. मात्र, त्यावर कुठलाही ठोस पर्याय निघाला नाही. 

दरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीच नमिता मुंदडा यांची राष्ट्रवादीतून उमेदवारी जाहीर केली. परंतु, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी आपल्या सोशल मिडीयाच्या बॅनर/पोस्टरवरुन पक्षाचे चिन्ह आणि पवारांचे फोटो काढून टाकत आपल्या अस्वस्थतेला वाट मोकळी करुन दिली. त्यांचा भाजप प्रवेश होऊन त्यांना भाजपची उमेदवारीही मिळेल, अशी अटकळ बांधली जात होती. परंतु, विद्यमान भाजप आमदार संगीता ठोंबरे यांनीही उमेदवारीसाठी मोठे प्रयत्न केले होते. अखेर सोमवारी सकाळी नमिता मुंदडा यांच्या भाजप प्रवेश आणि उमेदवारीला भाजपकडून ग्रीन सिग्नल मिळाल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली. 

आज किंवा उद्या त्यांचा भाजप प्रवेश होऊन त्यांना उमेदवारी मिळणार आहे. जाहीर केलेला उमेदवार पक्षांतर करत असल्याने राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. या निमित्ताने केज मतदार संघात नवीन राजकीय समिकरणे जन्माला येणार आहेत.

ठोंबरेंच्या भूमिकेकडे लक्ष
दरम्यान, भाजपच्या विद्यमान आमदार संगीता ठोंबरे यांची उमेदवारी कटल्यावरच शिक्कामोर्तब झाले आहे. त्यांनी शेवटपर्यंत उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न केले. आता ठोंबरे काय भूमिका घेणार याकडेही लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com