namita mundada support pankaja munde | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

चंद्रपूर जिल्ह्यात भाजप ला धक्का..सुधीर मुनगंटीवार वगळता भाजप चे सर्व उमेदवार पिछाडीवर...
सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघ उदयनराजे भोसले दुसऱ्या फेरीत 10500 हजार मतांनी पिछाडीवर
नितेश राणे यांना 8483 मतांची आघाडी पाचवी मतमोजणी फेरी पूर्ण
सावंतवाडी शिवसेनेनेचे दीपक केसरकर दुसऱ्या फेरीत 703 मतांनी आघाडीवर
कराड दक्षिण मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण 1200 मतांनी आघाडीवर
सातारा : सातारा विधानसभा भाजपचे शिवेंद्रराजे भोसले आघाडीवर
पिंपरी राखीव विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे अँड गौतम चाबुकस्वार हे मतदानाच्या पहिल्या फेरीत २,६६९ मतांनी आघाडीवर.
सिल्लोड : पहिल्या फेरीमध्ये शिवसेनेचे अब्दुल सत्तार यांना 2167 मतांची आघाडी
पहिल्या फेरीनंतर मुख्यमंत्री 2,560 मतांनी आघाडीवर
भोकर मतदारसंघात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आघाडीवर
भुसावळला पहिल्या फेरीत भाजपचे आमदार संजय सावकारे यांना 3960 मतांची आघाडी.
इंदापूर हर्षवर्धन पाटील 1000 मतांनी आघाडीवर
राज्यात मतमोजणीला सुरुवात

नमिता मुंदडांना आता पंकजा मुंडेंची साथ ! 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

दिवंगत लोकनेत्या डॉ. विमलताई मुंदडा यांनी सलग पाच वेळा केज मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत मंत्रीपदाच्या माध्यमातून मतदार संघात विकासाची अनेक कामे केली. यासह ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना मानणारा मोठा घटक मतदार संघात असल्याने मुंदडांचा दुहेरी फायदा मानण्या येतो. 

अंबाजोगाई : सासुबाई दिवंगत लोकनेत्या डॉ. विमलताई मुंदडा यांनी मतदार संघात विणलेले विकासाचे जाळे आणि सासरे नंदकिशोर मुंदडा व पती अक्षय मुंदडा यांच्या फळीला आता ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे बळ मिळाल्याने नमिता मुंदडा यांचा वारु वेगाने धावत आहे. जुन्या टीमला आता भाजपच्या नव्या फळीनेही बळ दिले आहे. 

सलग पाच वेळा विजयी होण्याचा विक्रम जिल्ह्यात दिवंगत लोकनेत्या डॉ. विमल मुंदडा यांनाच करता आलेला आहे. या मतदार संघातून सलग पाच वेळा विजयी होणाऱ्या दिवंगत मुंदडा यांनी आमदारकी आणि मंत्रीपदाच्या माध्यमातून स्वाराती रुग्णालयाचे विस्तारीकरण, मानसोपचार व वृद्धोपचार केंद्र, बंधारे, रस्ते, सीताफळ संशोधन केंद्र, उपजिल्हा रुग्णालये अशी अनेक विकास कामे केली. त्यांनी सामान्यांशी कधीही नाळ तुटू दिली नाही. उच्चशिक्षीत आणि मंत्रीपदावर असतानाही अंत्यविधी आणि इतर सुख -दु:खात सहभागी होणाऱ्या नेत्या अशी ओळख असलेल्या दिवंगत विमल मुंदडा यांना मतदारांनीही कधी हात आखडला नाही. त्यांच्या विजयाच्या मतांचा आलेख कामय उंचावलेलाच राहीला. तर, सासरे नंदकिशोर मुंदडां यांनीही मतदार संघात सामाजिक कामाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची फळी घट्ट विणलेली आहे. 

पती अक्षय मुंदडा यांचीही तरुण फळी आहे. दरम्यान, मागच्या पराभवातनंतर मुंदडा कुटूंबियांनी सामाजिक, अध्यात्मिक, सांस्कृतिक, विवाह समारंभ आणि इतर सार्वजनिक व सुख - दु:खाच्या प्रसंगात सहभागी होत आपला संपर्क कायम ठेवला. पक्षांतर्गत त्रासातही त्यांनी कधी विचलीत न होता सामान्यांशी नाळ घट्ट ठेवली. म्हणूनच त्या सर्वेमध्ये पुढे असल्याने त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्याचे खुद्द ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनीच सांगितले. 

दरम्यान, त्यांना भाजप प्रवेशानंतर उमेदवारी भेटून त्यांनी जोरदार प्रचारालाही सुरुवात केली आहे. मतदार संघाची सामाजिक रचनाच मुळ भाजप पुरक असून मतदार संघात पंकजा मुंडे यांना मानणारा मोठा घटक असल्याने त्याची साथ सहाजिकच नमिता मुंदडा यांना भेटणार आहे. त्यांच्या प्रवेशानंतर भाजपची टीम सोबत येईल का, या विरोधकांच्या प्रश्नांनाही आता पुर्णविराम भेटला आहे. 

मुंदडांच्या टिमसोबतच आता मतदार संघातील रमेश आडसकर, सभापती संतोष हंगे, जिल्हा परिषद सदस्या डॉ. योगीनी थोरात, राणा डोईफोडे, रासपचे बाळासाहेब दोडतले, अंबाजोगाईचे लोमटे व कोपले आदी नेत्यांनीही आता प्रचारात सक्रीय सहभाग घेतला आहे. त्यामुळे नमिता मुंदडांच्या अगोदरच्या घट्ट जाळ्याला आता पंकजा मुंडे यांचे बळ मिळणार आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख