राम शिंदेंचे एक टेन्शन विखे पाटलांनी संपवले! 

नामदेव राऊत हे रिंगणात उतरले असते तर राम शिंदे यांची जागा धोक्यात आली असती. प्रसंगी भाजपलाही जागा गमवावी लागली असती. मात्र आता नामदेवराऊत हे लढणार नसल्याने राम शिंदे यांचे एक टेन्शन कमीझाले आहे.
राम शिंदेंचे एक टेन्शन विखे पाटलांनी संपवले! 

कर्जत (नगर) : नगरचे पालकमंत्री राम शिंदे यांना आव्हान ठरू पाहणारे कर्जतचे उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांची मनधरणी करण्यात अखेर भाजपनेत्यांना यश आले आहे. खासदार सुजय विखे पाटील यांनी मध्यस्थी केल्याने राऊत आता भाजपमध्येच राहणार असून, विधानसभा निवडणुकीत शिंदे यांना मदत करणार आहेत.  

कर्जत येथे आज पत्रकार परिषदेत राऊत यांनी आपण भाजपमध्येच राहणार असल्याचे घोषित केले. 

विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना राऊत यांचे कौतुक केले. राऊत यांची ताकद मोठी असल्याने त्यांच्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी करून त्यांना थांबवण्याची जबाबदारी आपल्यावर दिली आहे. त्यांच्या कामाची पक्षपातळीवर दखल घेऊन राऊत यांना आगामी काळात मोठी जबाबदारी सोपावण्यात येईल, असे सांगून भाजपाचे सरकार येणार असून, पक्षासाठी आपण काम करावे, असे आवाहन केले. 

पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले, आपण पक्षाकडे आपला विचार करण्याचा आग्रह धरला होता. विखे पाटील यांनी मध्यस्थी केली नसती, तर आपल्याला सर्व पर्याय खुले होतेच, मात्र कर्जत-जामखेडचे प्रतिनिधीत्त्व स्थानिक भूमिपूत्रानेच करावे, ही भूमिका कायम असून, भविष्यातही तोच विचार राहिल. मात्र आगामी विधानसभेचा भाजपचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करू, असे राऊत यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com