कर्जत-जामखेडचा 'किंग' मीच बनणार!

पक्षाला उमेदवारी मागितली आहे. येत्या आठ दिवसांत भूमिका जाहीर करणार. तोपर्यंत सर्व पर्याय खुले आहेत.
कर्जत-जामखेडचा 'किंग' मीच बनणार!

कर्जत (नगर) : कोणत्याही परिस्थितीत विधानसभा निवडणूक लढणार आहे. आता किंगमेकर नाही, तर प्रत्यक्ष निवडणूक लढवून किंग बनणार, असा निर्धार भाजपा नेते तथा कर्जतचे उपनगराध्यक्ष नामदेव राऊत केला.

कर्जत- जामखेड महासंग्राम युवा मंचच्यावतीने अगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य परमवीर पांडूळे होते. 

राऊत म्हणाले, गेल्या पंचवीस वर्षांपासून पक्षाचे लोकसभा व विधानसभा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले. दोन विधानसभा निवडणुकीत उमेदवारीचा प्रयत्न केला. पण  उमेदवारी मिळाली नाही. तसेच कार्यकर्त्यांकडे होत असलेले दुर्लक्ष, यामुळे पक्षाकडे उमेदवारी मागून इच्छा व्यक्त केली. आठ दिवस सर्व पर्याय खुले आहेत. आता किंगमेकर नाही, तर 
आमदारकी लढणारच. याबाबत कुठला निर्णय पक्षाने वा श्रेष्टींनी न दिल्यास येत्या आठ दिवसात महामेळावा घेऊन अंतिम निर्णय जाहीर केला जाईल, असा अल्टीमेट त्यांनी या वेळी 
दिला.

ते म्हणाले, मला परिस्थितीची जाणीव आहे. 2009 व 2014 मध्ये आपण पक्षाकडे उमेदवारी मागितली. पण मला डावलले गेले. येत्या विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडे आपण उमेदवारी मागितली आहे. पक्षाने आठ दिवसांत निर्णय घ्यावा, अन्यथा सर्व पर्याय खुले आहेत. आता माघार नाही विधानसभा निवडणूक लढविणार आहे. पुढे दोन बलाढ्य उमेदवार आहेत. यांचा मी विचार करत नाही, कारण कर्जत- जामखेड विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनता माझ्या बरोबर आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com