जि.प. शिक्षकांनी दिले कोविड सेंटरला ऑक्सिजन सिलिंडर, व्हॉट्सॲप ग्रुपमधून केली मदत...

कोरोनाच्या कामात कर्तव्यावर पाठविले म्हणून ओरड करणारेही शिक्षक आज आहेत. पण कोरोना बाधितांसाठी स्वेच्छेने लाखो रुपयांची मदत उभी करणारे हे शिक्षकसुद्धा आहेत. राज्यभरातील शिक्षकांनी जर मनावर घेतले तर कोरोनावर मात करण्याच्या या लढ्यात मोठे सहकार्य होऊ शकते.
Sarkarnama Banner
Sarkarnama Banner

नागपूर : शिक्षक हा समाजशील प्राणी आहे. देशावर आलेल्या प्रत्येक संकटात शिक्षकांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. (Teachers have played an important role) वैश्विक कोरोना संकटात शिक्षक स्वतःला वेगळा कसा ठेवू शकेल? त्यामुळे काटोल विधानसभा (Katol Assembly) जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक आघाडी या व्हॉट्सॲप ग्रुपच्या (Whatsapp Group) माध्यमातून काटोल नरखेड तालुक्यांतील जवळपास ३०० शिक्षकांनी (300 Teachers) ग्रामीण रुग्णालय काटोल आणि नरखेड येथे सुमारे दीड लक्ष रुपयाची कोरोनावरील औषधी आणि ऑक्सिजन दिले. (One and a half lakh rupees worth of medicine and oxygen were given)

सामाजिक दायित्वाचा भाग म्हणून शिक्षकांनी ३.५ लक्ष रुपये गोळा केले. या कोविड निधीतून ग्रामीण रुग्णालयात, काटोल येथे पाच जम्बो ऑक्सिजन सिलिंडर फ्लो मीटरसह व दोन इन्व्हर्टर बॅटरी देण्यात आली. तसेच हे सर्व साहित्य शिक्षकांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिनेश डवरे व वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुधीर वाघमारे यांच्याकडे सुपूर्द केले. जिल्हा परिषद मधील शिक्षकांनी राबविलेल्या या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे. सर्वसामान्य जनतेसाठी शिक्षकांनी दाखविलेली सामाजिक दातृत्वाची कृती कौतुकास्पद व इतरांसाठी प्रेरणादायी असल्याची प्रतिक्रिया वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिनेश डवरे यांनी व्यक्त केली.

कोरोनाची महामारी सुरू असताना जेथे आपल्या राज्याचे मंत्री आणि आमदार कोरोना निधी देत नाहीत. तेथे शिक्षकांनी घेतलेला हा पुढाकार मोठा आहे. समाजातील प्रत्येकच घटक कोरोना काळात आपआपल्या परीने जमेल तशी मदत लोकांना करत आहे. नागपुरातील एक ऑटोचालक आपल्या ऑटोमध्ये ऑक्सिजनच्या सुविधेसह निःशुल्क सेवा रुग्णांना देत आहे. याशिवाय इतर सामान्य लोकांकडूनही रुग्णालयांच्या समोर आणि परिसरात जेवण आणि चहा-पाणी यांसह सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.  

काटोल आणि नरखेड तालुक्यांतील शिक्षकांनी केलेल्या या कामामुळे जिल्ह्याच्या इतरही तालुक्यांतील शिक्षकांनी प्रेरणा घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. नाही तर कोरोनाच्या कामात कर्तव्यावर पाठविले म्हणून ओरड करणारेही शिक्षक आज आहेत. पण कोरोना बाधितांसाठी स्वेच्छेने लाखो रुपयांची मदत उभी करणारे हे शिक्षकसुद्धा आहेत. राज्यभरातील शिक्षकांनी जर मनावर घेतले तर कोरोनावर मात करण्याच्या या लढ्यात मोठे सहकार्य होऊ शकते, अशा प्रतिक्रिया आता समाजातून व्यक्त होत आहेत. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com