यशोमतीताई, राज्यभरातून मुंबईला येणाऱ्या महिलांच्या निवासाची व्यवस्था करा...

मुंबई येथे मंत्रालय व अन्य कामांकरिता महिलांना जावे लागते. तेव्हा त्यांच्या निवासाच्या प्रश्न नेहमी उद्भवत असतो. निवासाची सोय उपलब्ध नसल्यामुळे त्यांच्या सुरक्षेच्यादेखील गंभीर प्रश्न निर्माण होत असतो.
Sarkarnama Banner
Sarkarnama Banner

नागपूर : राज्यातून कामानिमित्त मुंबईत मोठ्या संख्येने महिला येत असतात. (A large number of women come to Mumbai) त्यांच्यासाठी निवासाची व्यवस्था नसल्यामुळे महिलांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असते. अनेकदा महिलांवर मुंबई येथे वाईट प्रसंग घडत असतात. त्यामुळे महिलांच्या सोयीकरिता व सुरक्षेकरिता (For convenience and safety) मुंबईत स्वतंत्र निवासाची व्यवस्था (Arrangement of independent accommodation) करून द्यावी, अशी मागणी वरोराच्या आमदार प्रतिभा धानोरकर (MLA Pratibha Dhanorkar) यांनी महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडे केली आहे. 

मुंबई येथे भेटून त्यांना मागणीचे निवेदनदेखील देण्यात आले. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाअध्यक्ष नाना पाटोले उपस्थित होते. आज राजकारणात तसेच प्रशासकीय सेवेत मोठ्या प्रमाणात महिला सक्रिय आहेत. त्या पुरुषांच्या तुलनेत कुठेही मागे नाहीत. मुंबई येथे मंत्रालय व अन्य कामांकरिता महिलांना जावे लागते. तेव्हा त्यांच्या निवासाच्या प्रश्न नेहमी उद्भवत असतो. निवासाची सोय उपलब्ध नसल्यामुळे त्यांच्या सुरक्षेच्यादेखील गंभीर प्रश्न निर्माण होत असतो. त्यामुळे येत्या काळात यशोमती ठाकूर यांनी हा प्रश्न निकाली काढावा, अशी लोकहितकारी मागणी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केली आहे.
 

आमदार धानोरकर नेहमी महिलांच्या प्रश्नावर आवाज उठवत असतात. महिलांना न्याय मिळवून देण्याकरिता नेहमी त्या आग्रही असतात. नेहमीसाठी महिलांचा मोठी समस्या निकाली काढण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला आहे आणि लवकरच ही समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन मंत्री यशोमतीताई ठाकूर यांनी दिले आहे.

केवळ आपल्या मतदारसंघातच नाही तर राज्यभरातील महिलांचे प्रश्‍न आमदार धानोरकर सातत्याने हाताळत असतात. सभागृहातही त्यांचा आवाज बुलंद असतो. केवळ महिलांसाठीच नाही तर तृतीयपंथीयांना सन्मानाने जगता यावे, म्हणून त्यांनी प्रयत्न चालविले आहेत. तृतीयपंथीयांना समाजात सन्मानाने जगता यावे, यासाठी त्यांना पोलीस विभागात व इतर विभागात दोन टक्के आरक्षण देऊन नोकरीत स्थान द्यावे, अशी मागणी यापूर्वीच केली केली आहे.

तृतीयपंथीयांकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. त्यांना रोजगाराचे पुरेसे साधन उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांच्यामध्ये कौशल्य असूनही तृतीयपंथीय जगण्यासाठी रेल्वेस्थानक, बसस्थानक परिसरात लोकांना आर्थिक मदत मागत असतात. अनेकांकडून त्यांना हीन दर्जाची वागणूक दिली जाते. त्यामुळे त्यांना समाजात स्थान मिळवून देण्यासाठी तसेच त्यांचे आर्थिक स्रोत वाढावे, नोकरभरतीत त्यांचे प्रमाण वाढावे, यासाठी पोलीस विभागासह इतर विभागांत दोन टक्के आरक्षण देऊन शासकीय नोकरीत सहभागी करावे, अशी त्यांची मागणी आहे. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com