८ ते १२ फेब्रुवारीदरम्यान कोठे होत्या चित्रा वाघ ?

पती किशोर वाघ यांना एसीबीच्या कारवाईतून वाचवताना त्या सैरभैर झाल्या आहेत. पण पूजा चव्हाणचा मृत्यू झाल्यानंतर लगेच त्या ॲक्शन मोडमध्ये का नाही आल्या, त्यासाठी १२ फेब्रुवारीचाच मुहूर्त कसा काय काय निवडला, याचेही उत्तर त्यांनी दिले पाहिजे.
Shrikant Shivankar - Chitra Wagh
Shrikant Shivankar - Chitra Wagh

नागपूर : राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांना पूजा चव्हाणच्या मृत्यू प्रकरणात जबाबदार धरले जात आहे. भाजपच्या प्रवक्त्या चित्रा वाघ यांनी राठोड यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. पण चित्रा वाघ १२ फेब्रुवारीनंतर ॲक्टीव झाल्या आणि पूजा चव्हाणचा मृत्यू ८ फेब्रुवारीला झाला. त्यामुळे ८ ते १२ फेब्रुवारीदरम्यान त्या कोठे होत्या, असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर प्रवक्ता श्रीकांत शिवणकर यांनी केला आहे. 

शिवणकर म्हणाले, पूजा चव्हाणचे पालकत्वच जणू वाघ यांनी स्वीकारले असल्याचे जाणवतेय. संजय राठोड यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा विडाच त्यांनी उचलला आहे. पण त्यांचे पती किशोर वाघ यांच्यावर १२ फेब्रुवारीला गुन्हा दाखल झाला. तेव्हापासून त्यांनी राठोडांच्या विरोधात मोर्चा उघडला. हे आता लोकांच्या लक्षात येत आहे. मुळात किशोर वाघ यांच्यावरील आरोपांची खुली चौकशी भाजपने २०१६ मध्येच सुरू केली होती. आता किशोर वाघ यांच्यावर गुन्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केल्यानंतर आपल्याला छळले जात असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे. पूजा चव्हाण मृत्युप्रकरणात सरकारला जाब विचारल्यामुळेच ही कारवाई केल्याचेही त्यांनी म्हटले आहे. पण १२ फेब्रुवारीच्या नंतरच त्यांनी पूजा चव्हाण प्रकरण हाती घेतले आहे. 

संजय राठोड प्रकरणावरून टिका करताना महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांचे सर्व मंत्रीही तसेच आहेत, अशीही टिका चित्रा वाघ यांनी केली होती. यावरूनही शिवणकर यांनी वाघ यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राठोड प्रकरणाची चौकशी सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी तसे आदेश यंत्रणेला दिले आहे. चौकशीत सत्य काय ते निष्पन्न होईलच. पण स्वतः सरकारवर टिका करताना सरसकट सर्व मंत्र्यांवर कसेही आरोप करणे योग्य नाही. पती किशोर वाघ यांना एसीबीच्या कारवाईतून वाचवताना त्या सैरभैर झाल्या आहेत. पण पूजा चव्हाणचा मृत्यू झाल्यानंतर लगेच त्या ॲक्शन मोडमध्ये का नाही आल्या, त्यासाठी १२ फेब्रुवारीचाच मुहूर्त कसा काय काय निवडला, याचेही उत्तर त्यांनी दिले पाहिजे, असेही शिवणकर म्हणाले. 

याबाबत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनीही चित्रा वाघ यांच्यावर टिका केली आहे. आपल्या ट्विटमध्ये आमदार मिटकरी म्हणतात, ''किशोर वाघ सरांवर 12 फेब्रुवारीला गुन्हा दाखल झाला आहे. भाजपने 2016 मध्ये याबाबत खुली चौकशी सुरू केली होती. आपण भाजपत गेला नसता तर देवेंद्र फडणवीसांनी तेव्हाच गुन्हा दाखल केला असता. आपण साहेबांच्या तालमीत तयार झाल्या आहात. त्यामुळे दिशाभूल करू नये''. मिटकरी यांनी एसीबीने दाखल केलेल्या गुन्ह्याची एफआरआयची कॉपीसुद्धा ट्विटरवर पोस्ट केली आहे.  
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com