हवेतून ऑक्सिजन मिळविण्यामध्ये आपण स्वयंपूर्ण झालो पाहिजे : नितीन गडकरी - we must be self sufficient ingetting oxygen from the air sad nitin gadkari | Politics Marathi News - Sarkarnama

हवेतून ऑक्सिजन मिळविण्यामध्ये आपण स्वयंपूर्ण झालो पाहिजे : नितीन गडकरी

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 10 मे 2021

मेळघाटमधील डॉ. सातव यांनी व्हेंटीलेटर आणि इतर साहित्य पाठविले. तेथे त्यांनी त्याचा चांगला उपयोग केला. कारण ते स्वतः तज्ज्ञ आहेत. मध्य नागपूरमधले कन्हेरे, कन्हैय्या कटाळे आणि छोटू बोरीकर या कार्यकर्यांचे कौतुक वाटते. जे लोक गंभीर झाले, अशांच्या घरी या तिघांनी ऑक्सिजन पोहोचवून देण्याची व्यवस्था केली.

नागपूर : नागपूर शहरात, (Nagpur City)  एम्स, मेडिकल मेयो (AIIMS, Medical Mayo) iया तीन हॉस्पिटलला दररोज ६० टन ऑक्सिजन (Oxygen) लागतो. मेघे आणि लता मंगेशकर (Meght and Lata Mangeshkar) या दोन्ही हॉस्पिटलमध्ये ५० पेक्षा जास्त बेड्स आहेत. त्यांनी हवेतून (From Air) ऑक्सिजन मिळवण्याची यंत्रणा बसवावी, असे आवाहन त्यांना केले होते. त्यात यश मिळाले आहे. यानंतर तर ७ ते ८ हॉस्पिटल्सना सीएसआर निधीतून मदत मिळवून देऊन, असे प्लांट तयार करून दिले. यामध्ये डॉ. चौधरी आणि डॉ. दंदेकडे असे प्लांट तयार झाले आहेत. हवेतून ऑक्सिजन मिळविण्यामध्ये आपण स्वयंपूर्ण झालो पाहिजे, असा धडा या कोरोनाकाळाने आपल्याला दिला असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले. 

भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित (ऑनलाइन) करताना गडकरी बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, शहराध्यक्ष व आमदार प्रवीण दटके यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. गडकरी म्हणाले की, हॉस्पिटल आणि कोविड सेंटर उघडले पाहिजेत, असे आपल्या अनेक नगरसेवकांना वाटते. परंतु हे काम अतिशय जोखीमेचे आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनचे जे हॉस्पिटल्स आहेत, त्यांनीच आपल्या बेड्स संख्या वाढविणे आणि त्यांनी कोविड सेंटर उभारणे, हे जास्त चांगले राहील. कारण त्यांच्याकडे डॉक्टर, नर्सेस, सफाई कामगारांसह सर्व स्टाफ आहे. 

अजय संचेतींनी हॉटेल सेंटर पॉइंटमध्ये हॉस्पिटल चालवायला घेतले. सागर आणि समीर मेघेंनी हॉटेल प्राईडमध्ये हॉस्पिटल चालवायला घेतले. हे जास्त चांगले आहे. आपण एम्समध्येही येत्या १५ ते २० दिवसांत बेड्सची संख्या ६०० ते ७०० नी वाढवणार आहोत. कोविड केंद्र उभारणे, हा विचार चांगला आहे. पण त्याची जबाबदारी घेणे अवघड आहे. ऑक्सिजन आणि इतर औषधे नागपूरसह विदर्भात सर्वदूर देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे गडकरींनी सांगितले.  

मेळघाटमधील डॉ. सातव यांनी व्हेंटीलेटर आणि इतर साहित्य पाठविले. तेथे त्यांनी त्याचा चांगला उपयोग केला. कारण ते स्वतः तज्ज्ञ आहेत. मध्य नागपूरमधले कन्हेरे, कन्हैय्या कटाळे आणि छोटू बोरीकर या कार्यकर्यांचे कौतुक वाटते. जे लोक गंभीर झाले, अशांच्या घरी या तिघांनी ऑक्सिजन पोहोचवून देण्याची व्यवस्था केली. त्यातले तंत्र समजावून घेतले आणि सिलिंडर गोळा करून ते लोकांना दिले आणि अनेकांचे प्राण वाचविले.

हेही वाचा : महाराष्ट्रातील सत्ता गेल्यानंतर भाजप नेते तब्बल दीड वर्षानंतर खळखळून हसले.....

यांपैकी छोटू बोरीकर माझ्याकडे आले होते आणि अधिक ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा व्हावा, असे म्हणाले. त्यांची तशी व्यवस्था केली जाईल. या तिघांनी जसे काम केले, तसे २० ते २५ केंद्र नागपूर शहर आणि ग्रामीणमध्ये तयार करावे लागतील. प्रवीण दटके यांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा. जेणेकरून तिसऱ्या लाटेसाठी आपल्याला सज्ज राहता येईल, असे नितीन गडकरी म्हणाले. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख