तुकुमवाल्यांनी असे उधळले भाजपच्या माजी आमदाराचे मनसुबे...

मनपाचे पथक (Municipal Corporation's Team) आल्यापावली माघारी परतले. यावेळी जव्हेरी (Former MLA Jainuddin Javheri) यांच्याविरोधात तीव्र संताप व्यक्त करीत घोषणाबाजी करण्यात आली.
तुकुमवाल्यांनी असे उधळले भाजपच्या माजी आमदाराचे मनसुबे...

चंद्रपूर : केवळ आपल्या शैक्षणिक संस्थेकडे जाणारा रस्ता प्रशस्त करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी यांनी भर पावसाळ्यात तुकूम परिसरातील लोकांची घरे पाडण्याचे मनसुबे आखले होते. पण लोकांनीही एकीचे बळ दाखवत भाजप नेत्याचे मनसुबे उधळून लावले.

जैनुद्दीन जव्हेरी यांनी नझूलच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्याचे आदेश उच्च न्यायालयातून आणले. त्यानंतर आज महानगरपालिकेचे अतिक्रमण हटाव पथक तुकूम परिसरात धडकले. मात्र, नागरिकांनी अतिक्रमण हटविण्याला प्रचंड विरोध केला. काही काळ रस्त्यावर ठाण मांडले. त्यामुळे मनपाचे पथक आल्यापावली माघारी परतले. यावेळी जव्हेरी यांच्याविरोधात तीव्र संताप व्यक्त करीत घोषणाबाजी करण्यात आली.

शहरातील तुकूम प्रभाग ही जुनी वस्ती आहे. मागील ४० ते ५० वर्षांपासून येथे नागरिकांचे वास्तव्य आहे. प्रभागातील काहींनी नझुलच्या जागेवर घरे बांधून ते आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. या परिसरात जैनुद्दीन जव्हेरी यांची शैक्षणिक संस्था आहे. या संस्थेकडे जाण्यासाठी रस्ता तयार करण्याच्या उद्देशातून जव्हेरी यांनी उच्च न्यायालयात नझूलच्या जमिनीवर अतिक्रमण करून बांधण्यात आलेली घरे पाडण्याची परवानगी देण्यासंदर्भात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने जव्हेरी यांच्या बाजूने निकाल देत अतिक्रमण करण्यात आलेली चार घरे पाडण्याचे निर्देश दिले.

त्यानुसार महानगरपालिकेचे पथक आज तुकूम परिसरातील अतिक्रमित घरे पाडण्यासाठी पोहोचले. याची माहिती होताच परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन या प्रकाराला विरोध केला. काही काळ रस्ता रोखून धरला. त्यानंतर चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांचे कोणतेही म्हणणे ऐकून न घेता ऐन पावसाळ्याच्या दिवसांत घरे पाडण्याची कारवाई चुकीची असल्याचा आरोप केला. भाजपचे नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांनीही माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी यांनी न्यायालयात खोटी माहिती सादर करून अतिक्रमण हटावचे आदेश आणले आहेत. हा येथील नागरिकांवर अन्याय आहे. त्यामुळे याविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगितले.

तुकुमवाल्यांनी असे उधळले भाजपच्या माजी आमदाराचे मनसुबे...
किरीट सोमय्यांवरील कारवाईने भाजप नेते आक्रमक  

भाजप नेते तथा माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी यांनी आपल्या शैक्षणिक संस्थेकडे जाणारा रस्ता मोठा करण्यासाठी घरे पाडण्याचे आदेश आणले आहेत. हा प्रकार संतापजनक आहे. त्यात मनपा प्रशासनानेही केवळ २४ तासांची नोटीस बजावत अतिक्रमण हटविण्यासाठी पथक पाठविले. त्यामुळे मनपा आणि जव्हेरी यांचा निषेध व्यक्त केला जात आहे.

पावसाळ्यात कुणाचेही घरे पाडता येत नाही, असे स्पष्ट निर्देश आहेत. ही कारवाई करणे चुकीचे आहे.

- रितेश (रामू) तिवारी,

जिल्हाध्यक्ष, शहर काँग्रेस, चंद्रपूर

तुकूम परिसरातील ही घरे ४० ते ५० वर्षांपासून वास्तव्यात आहेत. भाजप नेते तथा माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी यांनी न्यायालयात चुकीची माहिती सादर करून अतिक्रमण हटविण्याचे आदेश आणले आहेत. त्यामुळे याविरोधात येत्या काळात तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे.

- सुभाष कासनगोट्टूवार,

नगरसेवक, चंद्रपूर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com