वाघांना वाचविण्यासाठी आदिवासी शेतकरी रस्त्यावर...

मेळघाट व्याघ्र प्रकल्प रेल्वे मार्ग रद्द करून, अकोट बरानपूर हा बुलडाणा जिल्ह्यातून रेल्वे मार्ग झाला पाहिजे. या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर आली आहे.
traibal1f.jpg
traibal1f.jpg

बुलढाणा : अकोला खंडवा रेल्वे मार्गाचं रुंदीकरण सध्या सुरु आहे, हा मार्ग रेल्वे मंत्रालयानुसार मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जाणार आहे. पण हा रेल्वे मार्ग मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून न करता बुलढाणा जिल्ह्यातून पर्यायी मार्गाने न्यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व या भागातील आदिवासी सरकारच लक्ष वेधण्यासाठी मोठ आंदोलन बुलढाणा आणि अकोला जिल्ह्याच्या सीमेवर वारखेड़ गावाजवळ सुरु आहे. 

अलिकडेच मुख्यमंत्र्यांनी रेल्वे मंत्रालयाला पत्र लिहून हा मार्ग पर्यायी मार्गाने करायची मागणी केली होती. कालच वाघाना वाचविण्यासाठी मुख्यमंत्रानी वाघांच्या नसबंदीचा प्रस्ताव फेटाळला आहे. या पार्श्वभूमीवर हे आंदोलन आहे. 

या भागातील आदिवासी व शेतकऱ्यांसाठी हा रेल्वे मार्ग बुलढाणा जिल्ह्यातून तयार करावा, जेणेकरून बुलढाणा जिल्हयातील आदिवासी भागाचा विकास होऊन या भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला वाहतूक करण्यासाठी रेल्वेची मदत होईल, अशी भावना या आंदोलनकर्त्यांची आहे. त्यामुळे आज सकाळी या भागातील आदिवासी व स्वाभिमानी शेतकरी संघटना या रस्त्यावर उतरून आंदोलनात सहभागी झाले आहेत. रेल्वे मंत्रालयाला व सरकारला जागे करण्यासाठी घोषणा देण्यात आल्या.

   
स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात सकाळी पहाटे पासून शेकडो शेतकरी रस्त्यावर आले आहेत. मेळघाट व्याघ्र प्रकल्प रेल्वे मार्ग रद्द करून, अकोट बरानपूर हा बुलडाणा जिल्ह्यातून रेल्वे मार्ग झाला पाहिजे. या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर आली आहे. जंगल वाचलं पाहिजे व वाघ ही वाचले पाहिजेत, यासाठी स्वाभिमानीचे हे आंदोलन सुरू आहे.  रेल्वे मार्गामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत. त्या शेतकऱ्यांना केंद्र सरकार व राज्य सरकार कडून जमिनीचा योग्य मोबदला द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. 

 ९ ऑगस्ट क्रांती दिनी महात्मा गांधींच्या विचाराने आंदोलन करण्यात येत आहे. पण येणाऱ्या काळामध्ये आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचा इशारा या आंदोलनातून स्वाभिमानीकडून सरकारला देण्यात आला आहे.

 Edited  by : Mangesh Mahale  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com