उपराजधानीत कोरोनासोबतच वाढतेय सारीचीही दहशत 

एक ते आठ जुलैदरम्यान 385 कोरोनाबाधितांची भर पडल्याने बाधितांचा आकडा 1894 वर पोचला आहे. उपराजधानीत एकाच दिवशी दोन मृत्यू झाले होते. 4 जून रोजी अमरावती आणि मध्यप्रदेशातील दोन व्यक्तींचा मृत्यू झाला होता. यानंतर 26 जून रोजी मोमीनपुरा आणि गोंदियातील दोन व्यक्तींचा मृत्यू मेयो रुग्णालयात झाला होता. यानंतर आज अमरावती, मध्यप्रदेश आणि नागपूर येथील तिघांचा मृत्यू झाला.
nagpur zero mile-corona
nagpur zero mile-corona

नागपूर : कोरोनामुळे मरणाऱ्यांची संख्या नागपुरात सर्वात कमी असल्याचे सांगण्यात येते. पण गेल्या काही दिवसांपासून ही संख्या वाढत चालली आहे. आज एकाच दिवशी कोरोनाने तीन बळी घेतले. गेल्या साडेतीन महीन्याच्या इतिहासातील ही पहीलीच घटना आहे. त्यामुळे प्रशासन हादरले आहे. कोरोनाने दिवसागणिक स्थिती गंभीर होत असताना सारीच्या आजाराचा कहरही सुरुच आहे. सारीने दोघे दगावले आहे. दिवसेंदिवस स्थिही गंभीर होत चालल्यामुळे नागरिकही धास्तावले आहेत. 

मेयोच्या कोविड हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात अमरावती ये थील 71 तर मध्यप्रदेशातील सिवनी येथील 68 वर्षीय व्यक्तींचा एकाच दिवशी कोरोनाच्या बाधेने मृत्यू झाला. तर मेडिकलच्या कोविड हॉस्पिटलमध्ये नागपुरातील एका 74 वर्षीय व्यक्तीचा कोरोनाने बळी घेतला. एकाच दिवशी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मागील चार दिवसांत 5 जण दगावले. यामुळे कोरोनाच्या मृत्यूसत्रामुळे उपराजधानीची स्थिती गंभीर होत आहे. तीन मृत्यूंमुळे शहरातील मृतकांचा आकडा आता 30 वर पोचला आहे. 25 जणांना बाधा झाल्याचे निदान आज झाले. त्यामुळे शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा तब्बल 1894 वर पोचला आहे. 

अमरावती येथील 71 वर्षीय व्यक्ती दोन दिवसांपुर्वी मेयोत दाखल झाला होता. मात्र या वृद्धाला उच्च रक्तदाब, ह्दयविकार होता. दोन रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाला होता. सोबतच गंभीर स्वरुपाचा मधुमेह होता. अशातच या व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली. कोरोनामुळे श्‍वसन यंत्रणा आणि फुफ्फुसही निकामी झाले. हाय फ्लो नोझल ऑक्‍सिजन मास्क लावण्यात आले, परंतु त्याने उपचाराला दाद दिली नाही. अखेर रात्री उशीरा त्याचा मृत्यू झाला. यानंतर अवघ्या काही तासानंतर मध्यप्रदेशातील सिवनी येथील 68 वर्षीय व्यक्तीचा मध्यरात्रीनंतर मृत्यू झाला. त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल मेयोतून प्राप्त झाला होता. कोविड, न्युमोनियासह ह्दय विकाराचा झटका आल्यामुळे सिवनीतीलही एक व्यक्ती दगावला. त्यांनाही उच्चरक्तदाबासह मधुमेह होता. 

एक ते आठ जुलैदरम्यान 385 कोरोनाबाधितांची भर पडल्याने बाधितांचा आकडा 1894 वर पोचला आहे. उपराजधानीत एकाच दिवशी दोन मृत्यू झाले होते. 4 जून रोजी अमरावती आणि मध्यप्रदेशातील दोन व्यक्तींचा मृत्यू झाला होता. यानंतर 26 जून रोजी मोमीनपुरा आणि गोंदियातील दोन व्यक्तींचा मृत्यू मेयो रुग्णालयात झाला होता. यानंतर आज अमरावती, मध्यप्रदेश आणि नागपूर येथील तिघांचा मृत्यू झाला. दिवसेदिवस परिस्थिती गंभीर होत असल्याने जनमानसात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

सारीचे दोन मृत्यू 
शहरातील दोघांचा मेडिकलच्या कोविड वॉर्डात सारीच्या आजाराने मृत्यू झाला आहे. सत्तर वर्षीय महिला 7 जूलै रोजी मेडिकलमध्ये दाखल झाली. सारी आजाराची लक्षणे असल्याने तिची कोविड चाचणी करण्यात आली. यानंतर लगेच 65 वर्षीय व्यक्तीदेखील 7 जूलै रोजी दाखल झाल्यानंतर लगेच कोविड चाचणी करण्यासाठी नमूने घेण्यात आले. मात्र दोघांचेही नमूने तपासण्यात आले. कोविडचा अहवाल निगेटिव्ह आला. सारीचे निदान झाले असून त्यांचा सारीने मृत्यू झाल्याची नोंद झाली. अशाप्रकारे कोरोनासोबतच सारीची दहशत उपराजधानीत आहे. (Edited By : Atul Mehere)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com