कोल्हापूर उत्तरवर शिवसेनेचा दावा कायम राहणार; संजय राऊतांचे सूचक वक्तव्य

कोल्हापूर उत्तरच्या जागेवरून काँग्रेस आणि शिवसेनेत वाद निर्माण झाला होता.
Sanjay Raut News | Sanjay Raut Latest News | ED Latest News | Latest Political News
Sanjay Raut News | Sanjay Raut Latest News | ED Latest News | Latest Political NewsSarkarnama

नागपूर : कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीवरून काँग्रेस (Congress) आणि शिवसेनेत (Shivsena) वाद निर्माण झाला आहे. ही जागा काँग्रेसला सोडल्याने राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) हे नाराज झाले होते. यावर शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य केले आहे. याचवेळी त्यांनी उत्तरबाबत सूचक वक्तव्य करीत या मतदारसंघावर दावेदारी कायम राखण्याचे संकेतही दिले आहेत.

कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. यामुळे शिवसैनिकांची नाराजी समोर आली होती. राऊत हे विदर्भ दौऱ्यावर आहेत. याबाबत बोलताना ते म्हणाले की, महाविकास आघाडीचा विचार करता आमच्या पक्षाकडे नसलेल्या जागांवर संघटनात्मक बांधणी करून निवडणूक लढवण्याचा आमचा मानस आहे. कोल्हापूरची जागा अनेक वेळा शिवसेनेने लढली असून, जिंकलीही आहे. मागील वेळी मात्र, शिवसेना-भाजप युती असताना शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाला होता. तेथे काँग्रेसचा उमेदवार निवडून आला होता. त्यामुळे पोटनिवडणुकीत ही जागा काँग्रेसला दिली आहे. पुन्हा 2024 मध्ये या जागेबाबत चर्चा होईल.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी राजेश क्षीरसागर यांची काल (ता.21) मनधरणी केली. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर माध्यमांंशी बोलताना क्षीरसागर म्हणाले होते की, पुढच्या पाच वर्षांतही हीच आघाडी सत्तेत असणार आहे. एकही शिवसैनिक भाजपला मतदान करणार नाही. भाजपकडून शिवसेनेच्या डोक्यावर पाय देण्याचे काम सुरू आहे. तुम्हाला राज्यात मोठं केलं त्याच हिंदुत्ववादी पक्षाच्या डोक्यावर तुम्ही पाय ठेवत आहात. शिवसैनिक हे कदापी विसरणार नाहीत. या निवडणुकीत शिवसैनिक मोठ्या ताकदीनं, मोठ्या जिद्दीनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीपेक्षा जास्त ताकदीनं उतरुन या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी करतील"

Sanjay Raut News | Sanjay Raut Latest News | ED Latest News | Latest Political News
लालूंची प्रकृती चिंताजनक; रांचीतून तातडीनं दिल्लीला 'एम्स'मध्ये हलवलं

ही पोटनिवडणूक लढवावी यासाठी क्षीरसागर यांच्यावर कार्यकर्त्यांचा दबाव होता. त्यासाठी त्यांना कार्यकर्ते फोनवरून विचारणा करत होते. यामुळे क्षीरसागर दोन दिवस नॉट रिचेबल होते. या कालावधीत त्यांनी मुंबईत काही नेत्यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडली होती. कोल्हापुरात नुकताच महाविकास आघाडीचा मेळावा झाला. या मेळाव्याला क्षीरसागर अनुपस्थित राहिले होते. याचवेळी त्यांनी आपल्या कार्यालयासमोर शक्तिप्रदर्शन केले. याची दखल घेऊन त्यांना मुख्यमंत्री ठाकरे यांनी चर्चेसाठी मुंबईत बोलावले होते. मातोश्रीवर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती.

Sanjay Raut News | Sanjay Raut Latest News | ED Latest News | Latest Political News
पेट्रोल, डिझेल, गॅस महागताच राहुल गांधी म्हणाले, आता खरा विकास सुरू झाला!

कोल्हापूर उत्तरची निवडणूक लढवण्याची इच्छा स्थानिक शिवसैनिकांनी व्यक्त केली होती. पण शिवसेनेने काँग्रेसचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना पाठिंबा द्यायचे ठरविले आहे. यामुळे काँग्रेसच्या जयश्री जाधव या आता महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत. उत्तर मतदारसंघातून शिवसेनेकडून राजेश क्षीरसागर यांना उमेदवारी मिळावी, असा आग्रह स्थानिक शिवसैनिकांनी धरला होता. अखेर क्षीरसागर यांनी त्यांची तलवार म्यान केली आहे. ही लढत पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिष्ठेची केली आहे. यामुळे या निवडणुकीकडे सगळ्यांचे लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com