नागपूर जिल्हा परिषदेचे आरक्षण नव्याने काढावे - देवेंद्र गोडबोले

सातत्याने तीनवेळा काढण्यात आलेले जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे आरक्षण नियमबाह्य आहे. ते नव्याने काढावे, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य आणि शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख देवेंद्र गोडबोले यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.
नागपूर जिल्हा परिषदेचे आरक्षण नव्याने काढावे - देवेंद्र गोडबोले

नागपूर : सातत्याने तीनवेळा काढण्यात आलेले जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे आरक्षण नियमबाह्य आहे. ते नव्याने काढावे, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य आणि शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख देवेंद्र गोडबोले यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.

तिसऱ्यांदा काढण्यात आलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना आहे. सर्वोच्च न्यायालय व मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार निवडणुकीचे आरक्षण 50 टक्केपेक्षा अधिक असू नये. मात्र, 30 एप्रिल रोजी काढण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या आरक्षणात ही मर्यादा ओलांडण्यात आली. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांना दोन वर्षांची अघोषित वाढ मिळाल्यामुळे सत्ताधारी निर्ढावलेले आहेत. सदस्यांमध्ये लोकांची कामे करण्याची उत्सुकता राहीलेली नाही. जिल्हा परिषदेत नव्याने कोणतेही काम होत नाही. यामुळे जिल्हा परिषद प्रशासनातही सुस्तपणा आला आहे. जिल्हा परिषद आरक्षणावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा
अन्यथा न्यायालयातून न्याय मिळवू, असे देवेंद्र गोडबोले म्हणाले.

निवडणूक आयोगाने राज्य सरकारला आरक्षणाचा निर्णय घ्यावा अशी विनवणी वारंवार केली. मात्र, राज्य सरकारने याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. हा सरकारचा निर्लज्जपणा आहे. नागपूर जिल्हा परिषद निवडणुका व्हाव्या असे सरकारला वाटत नसल्याचेही ते म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com