
वरोरा (जि. चंद्रपूर) : शहरातील आनंदवन चौकातील एका हॉटेलमध्ये जुगार खेळताना While playing Gambling झालेल्या वादातून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन मत्ते District Chief of Shiv Sena Nitin Matte यांनी मारहाण केली. या प्रकरणात मत्ते यांच्यासह चार जणांना वरोरा पोलिसांनी अटक केली. विशेष म्हणजे ज्या हॉटेलमध्ये जुगार सुरू होता. ते हॉटेल मत्ते यांच्या मालकीचे असल्याचे बोलले जात आहे.
पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर आनंदवनातील या हॉटेलमध्ये मागील आठवड्याभरापासून मोठा जुगार सुरू होता. येथे जुगार खेळण्यासाठी भद्रावती तालुक्यातील पाटाळा येथील प्रवीण पारखी (वय ३०) आला. प्रवीणने जुगारात जवळपास तास लाख रुपये जिंकले. त्याने एकहाती जुगारात सहभागी सर्वांचे खिसे रिकामे केले. त्यामुळे इतरांना त्यांच्यावर संशय आला. यावेळी नितीन मत्ते हेसुद्धा हजर होते. त्यांनीच प्रवीणच्या भ्रमणध्वनीत सेंसर आहे. त्यामुळे तो जुगार जिंकत असल्याचा आरोप केला. त्याला मत्ते आणि हॉटेल मधील इतर कर्मचाऱ्यांनी मारहाण केले.
गंभीर मारहाणीत प्रवीणला गंभीर दुखापत झाली. त्याला वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर चंद्रपुरातील शासकीय रुग्णालयात त्याला हलविण्यात आले. दोन दिवसांपूर्वीची ही घटना आहे. काल शुक्रवारी प्रवीणने वरोरा पोलिसात तक्रार दाखल केली. त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर मत्ते आणि इतर चार जणांवर भादंवि ३२४, १४३. १४७, १४९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. मत्ते यांच्यासह चार जणांना अटक केली. आज शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. वृत्त लिहीपर्यंत सुनावणी सुरू होती.
राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होण्याची घटना काही नवीन नाही. पण या प्रकरणात राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या जिल्ह्याच्या प्रमुख पदाधिकाऱ्याने जुगारात झालेल्या वादातून मारहाण केल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. ज्या हॉटेलमध्ये हा प्रकार झाला, ते सुद्धा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांच्या मालकीचे असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पदाचा गैरवापर करून ते येथे जुगार अड्डा तर चालवत नव्हते ना, अशी चर्चा जोर धरू लागली आहे. पोलिसांनी आता त्याच दिशेने तपास करावा, अशीही मागणी जोर धरत आहे.
तरच बसेल अशा घटनांना आळा..
बऱ्याचशा गुन्हेगारी घटनांमध्ये राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग असल्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात, नागरिकांचा रोष बघता बरेचदा अटकही केली जाते. पण पुढे मात्र काहीच होत नाही. राजकीय दबावामुळे पुन्हा असे लोक राजरोसपणे समाजात वावरत असतात. त्यामुळे अशा गुन्ह्यांत सापडलेल्यांना, मग भलेही तो राजकीय पुढारी का असेना, त्याला अटक करून शिक्षा ठोठावली गेली पाहिजे, असे मत नागरिकांनी व्यक्त केले.
Edited By : Atul Mehere
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.