राजनाथ सिंहांनी दिले गडकरींच्या नातवाला आशीर्वाद

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ( Nitin Gadakari ) यांच्या नागपूर निवासस्थानी आज केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह ( Rajnath Singh ) गेले.
Ramnath Singh
Ramnath SinghSarkarnama

नागपूर - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ( Nitin Gadakari ) यांच्या नागपूर निवासस्थानी आज केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह ( Rajnath Singh ) गेले. त्यावेळी त्यांनी नितीन गडकरी यांच्या नातवाच्या मुंज कार्यक्रमात उपस्थित राहिले तसेच गडकरींच्या नातवाला आशीर्वादही दिले. ( Rajnath Singh blesses Gadkari's grandson )

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज नागपूर चा दौरा केला यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी जाऊन कुटुंबाची भेट घेतली. जवळपास एक तासपर्यंत ही भेट चालली. यावेळी गडकरी आणि त्यांच्या पत्नीने त्यांचे स्वागत केले.

Ramnath Singh
Nitin Gadkari: माझे शब्द लिहून ठेवा, उसामुळे एकदिवस आत्महत्येची वेळ येईल..

नितीन गडकरी यांच्या नातवाच्या मुंजचा कार्यक्रम झाला त्यानिमित्ताने राजनाथ सिंह भेट देण्यासाठी पोहचले. ज्या नातवाच मुंज झाले त्याने राजनाथ सिंग यांच्या नमस्कार करून आशीर्वाद घेतला. राजनाथ सिंहांनी त्याला आशीर्वाद दिले.

Ramnath Singh
नितीन गडकरी `ते` तापदायक ११० स्पीड ब्रेकर हटवतील का?

या दरम्यान काही राजकीय चर्चा सुद्धा झाल्या असाव्या असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. विमानतळ वर उतरताच राजनाथ सिंह यांनी काही संरक्षणदलाच्या स्टेक होल्डर्स सोबत विमानतळावरच बैठक घेतली. या संरक्षणमंत्र्यांच्या भेटीमुळे नितीन गडकरी यांच्या घराला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in