कॉंग्रेसला आम्ही 'पडणाऱ्या' जागा मागत आहोत : प्रकाश आंबेडकरांचा टोला

राज्यातील ज्या लोकसभा मतदारसंघात गेल्या तीन-तीनवेळा कॉंग्रेसचा पराभव झाला आहे, अशा पडणाऱ्या जागा कॉंग्रेसकडे मागत आहोत. हे मतदारसंघही कॉंग्रेस देण्यास इच्छुक नाही, अशा शब्दात भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी कॉंग्रेसला टोला लगावला.
कॉंग्रेसला आम्ही 'पडणाऱ्या' जागा मागत आहोत : प्रकाश आंबेडकरांचा टोला

चंद्रपूर : राज्यातील ज्या लोकसभा मतदारसंघात गेल्या तीन-तीनवेळा कॉंग्रेसचा पराभव झाला आहे, अशा पडणाऱ्या जागा कॉंग्रेसकडे मागत आहोत. हे मतदारसंघही कॉंग्रेस देण्यास इच्छुक नाही, अशा शब्दात भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी कॉंग्रेसला टोला लगावला.

चंद्रपूर येथे त्यांची मंगळवारी जंगी जाहीरसभा झाली. एमआयएमचे अध्यक्ष खासदार असासुद्दीन ओवैसी या जाहीर सभेलाही हजर राहिले नाहीत. त्यांच्या गैरहजेरीत प्रकाश आंबेडकर यांनी कॉंग्रेसने राजकीय शहाणपणा दाखवावा, असे सुचविले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. कॉंग्रेसकडे 12 जागांचा प्रस्ताव ठेवला आहे. हे मतदारसंघ कॉंग्रेसने गेल्या तीन-तीन निवडणुकांमध्ये गमावलेले आहेत. या पडेल मतदारसंघाची मागणी भारिप-बहुजन महासंघाने केली आहे. हे पडेल मतदारसंघही कॉंग्रेस सोडण्यास तयार नाही. कॉंग्रेसने राजकीय शहाणपणा दाखविण्याची गरज आहे. हे शहाणपण दाखविल्यास त्यांना अधिक नुकसान सहन करावे लागेल, असा इशाराही आंबेडकर यांनी दिला.

मोदी बॅंकेतील पैसा गायब करतील
पुन्हा नरेंद्र मोदींना पंतप्रधान केल्यास ते तुमच्या बॅंकेतील पैसा गायब करतील. त्यामुळे पुन्हा मोदी पंतप्रधान होणार नाही, याची काळजी घ्या, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी श्रोत्यांना केले. मोदींना आता रिझर्व बॅंकेतील पैसाही हवा आहे. ते रिझर्व बॅंकेला खाली करण्याच्या मागे लागले आहे. पुढील लोकसभा निवडणुकीत पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यास ते तुमच्या बॅंकेतील पैसाही गायब करतील, यासाठी मतदारांनी हुशार राहण्याची आवश्‍यकता आहे, असेही आंबेडकर यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com