चंद्रपूर महानगर पालिकेत टक्केवारी, भागीदारी आणि दादागिरी...

आयुक्त मोहिते या सर्वांचा बचाव करीत आहे. त्यामुळे दोषी पदाधिकारी आणि नगरसेवक यांच्या सोबतच आयुक्त राजेश मोहिते यांनाही बरखास्त करून मनपात प्रशासक बसवावा.
Rakhi Kancharlawar - Mohite
Rakhi Kancharlawar - Mohite

चंद्रपूर : राज्यात सध्या सर्वाधिक चर्चा जर कोणत्या महानगरपालिकेची असेल, तर ती चंद्रपूरची. येथील सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्ष आता टोकाला गेला आहे. परवा परवा शिव्याशाप आणि हाणामारी झाली. त्यानंतर पोलिसांत परस्परविरोधी तक्रारीही झाल्या आणि आज शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी महापौर राखी कंचर्लावार Meyor Rakhi Kancharlawar आणि आयुक्त राजेश मोहिते Commissioner Rajesh Mohite यांना बरखास्त करण्याची मागणी केली. 

प्रत्येक कामांत टक्केवारी, भागीदारी आणि काम मिळविण्यासाठी दादागिरी, अशी नवी प्रथा मनपातील भाजपच्या सत्ताधाऱ्यांनी सुरू केली आहे. या भ्रष्ट कारभारात अधिकारीसुद्धा सामील आहेत. शहरवासींच्या कराचा अशा पद्धतीने दुरुपयोग होत आहे. पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या वर्तणुकीमुळे राज्यात महानगर पालिकेची बदनामी होत आहे. त्यामुळे महापौर राखी कंचर्लावार, आयुक्त राजेश मोहिते यांना बरखास्त करून पालिकेवर प्रशासक बसविण्यात यावा, अशी मागणी शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी आज पत्रकार परिषदेत केली.

चंद्रपूर महानगर पालिकेच्या २९ जुलै रोजी झालेल्या आमसभेत नियमांचे उल्लंघन केल्यामुळे विरोधी पक्षातील काही नगरसेवक तसेच सत्ताधारी पक्षाचा समर्थक असलेल्या एका नगरसेवकावर कारवाई करण्यात आली. या सभेमध्ये पीठासीन अधिकारी असलेल्या महापौर राखी कंचर्लावार यांनी विरोधकांवर नेम प्लेट आणि पाण्याची बॉटल फेकून लोकशाहीत एक नवीन पायंडा सुरू केला. पीठासन अधिकारी यांच्या सोबतचे उपमहापौर राहुल पावडे आणि स्थायी समिती सभापती राहुल पावडे यांनीसुद्धा खाली उतरून विरोधकांना अश्लील शिवीगाळ केली. त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. 

महापौरांचे पती असलेले नगरसेवक संजय कंचर्लावार यांनी एका अधिकाऱ्याला शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. महानगर पालिका अधिनियमातील कलम १२ नुसार या सदस्यांची वर्तणूक गंभीर स्वरूपाची असतानाही आजपावेतो आयुक्त मोहिते यांनी त्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई केली नाही. सभागृहात बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या पीठासीन अधिकारी आणि इतर पदाधिकाऱ्यांना आयुक्त कोणत्या आधारावर सूट देत आहेत, असा सवाल उपस्थित नगरसेवकांनी केला.

आयुक्त मोहिते या सर्वांचा बचाव करीत आहे. त्यामुळे दोषी पदाधिकारी आणि नगरसेवक यांच्या सोबतच आयुक्त राजेश मोहिते यांनाही बरखास्त करून मनपात प्रशासक बसवावा. यासंदर्भात येत्या ३ ऑगस्ट रोजी राज्याचे नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे तसेच नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची भेट घेणार असल्याचे नगरसेवक पप्पू देशमुख, मंगला आखरे, दीपक जयस्वाल आणि स्नेहल रामटेके यांनी सांगितले. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com