पाटणी म्हणाले, तू आणि बाजोरिया जिल्ह्यात कसे फिरता, पाहूनच घेईन...

तू जरी पाच टर्मची खासदार असली, तरीही तू कितीही प्रयत्न केले तही मी गुंठेवारीची खरेदी नियमित होऊ देणार नाही. त्यावर गोपीकिशन बाजोरिया यांनी पाटणी यांना सांगितले की, महीला खासदारासोबत असे अर्वाच्य भाषेत बोलू नको.
Bhawana Gawali and Rajendra Patni.
Bhawana Gawali and Rajendra Patni.

नागपूर : यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाच्या शिवसेना खासदार भावना गवळी आणि कारंजाचे भाजपचे आमदार राजेंद्र पाटणी यांच्यात २६ जानेवारीला शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर दोघांनीही वाशीम शहर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दिल्या. ‘तू आणि बाजोरिया जिल्ह्यात कसे फिरता, पाहूनच घेईन’, अशी धमकी दिल्याची तक्रार खासदार भावना गवळींनी दिली आहे. 

खासदार भावना गवळी यांनी वाशीम शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, २६ जानेवारीला पालकमंत्र्यांच्या बैठकीला जात असताना काही लोक गुंठेवारीतील भूखंडांसंदर्भात मला भेटायला आले होते. त्यांच्याशी चर्चा करीत असताना राजेंद्र सुखाराम पाटणी ७० ते ८० लोकांसह आले आणि मला व गोपीकिशन बाजोरीया यांना सांगितले की, गुंठेवारीच्या विषयामध्ये तुम्ही पडू नका. त्यावर आम्ही त्यांना सांगितले की, आम्ही हा विषय पालकमंत्र्यांसमोर मांडू आणि शासनदरबारी पाठपुरावा करू. कारण यामध्ये गोरगरीब जनतेची मेहनतीची रक्कम लागलेली आहे. भुखंड खरेदी सुरू झाल्यास गरीबांचा फायदा होईल. त्यावर पाटणी मला एकेरी भाषेत अर्वाच्य भाषेत बोलले. 

तू जरी पाच टर्मची खासदार असली, तरीही तू कितीही प्रयत्न केले तही मी गुंठेवारीची खरेदी नियमित होऊ देणार नाही. त्यावर गोपीकिशन बाजोरिया यांनी पाटणी यांना सांगितले की, महीला खासदारासोबत असे अर्वाच्य भाषेत बोलू नको, त्यावर ते म्हणाले की, तुम्ही दोघे मिळूनही माझे काही बिघडवू शकत नाही. तू व बाजोरिया वाशीम जिल्ह्यात कसे फिरता, असे म्हणत दमदाटी केली. माझ्या लोकांना सांगून पूर्ण वाशीम शहर व जिल्हा बंद करायला लावतो. तुमच्या विरुद्ध तक्रार करायला लावून तुम्ही आणलेली विकास कामे होऊ देणार नाही. तेव्हा मी त्याला म्हणाले की, माझ्यासोबत अर्वाच्य भाषेत बोलू नको. त्याउपरही त्याने धमक्या दिल्या. 

दरम्यान पालकमंत्री आल्‍याने आम्ही सर्व बैठकीसाठी निघून गेलो. राजेंद्र सुखानंद पाटणी यांनी अर्वाच्य भाषेत बोलून भारताच्या सर्वोच्च सभागृहाच्या महिला खासदाराचा अवमान केला आहे आणि धमकीसुद्धा दिली आहे. ते माझ्यावर व माझ्या कार्यकर्त्यांवर हल्लादेखील करू शकतात. त्यामुळे त्यांच्याविरोधात त्वरित गुन्हा दाखल करून कारवाई करावी. खासदार आणि आमदारात  झालेला हा वाद अजून शमलेला नाही. दोघांच्याही कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात धमक्या दिल्याच्या तक्रारी दाखल केल्या आहेत. पोलिसांनी सर्व तक्रारी चौकशीत ठेवल्या असल्या तरी त्यांची डोकेदुखी मात्र चांगलीच वाढली आहे. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com