पंचायत समिती सदस्याने मिळविली पीएचडी, राज्यपालांनी दिल्या शुभेच्छा...

सक्रिय राजकारण व इतर अनेक क्षेत्र सांभाळून त्यांनी आपली जिद्द पूर्ण करण्याचे ठरविले. अन् सहा वर्ष अथक परिश्रम करून सूक्ष्म जीवशास्त्र या विषयात पीएचडी पूर्ण केली.
PHD
PHD

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : आपण ज्या क्षेत्रात करिअर करतो, त्या क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. आयुष्याला कलाटणी देणाऱ्या घटनांमुळे ते शक्य होत नाही. पण हे सगळं सांभाळत आपली जिद्द पूर्ण करणारे लोक समाजात आहेत. याचा प्रत्यय दिला मनीष वासमवार यांनी. पंचायत समितीचे सदस्यपद, समाजकारण व आपली लेबोरेटरी सांभाळत त्यांनी सूक्ष्म जीवशास्त्र विषयात पीएचडी पूर्ण केली. गोंडवाना विद्यापीठात कुलगुरूच्या हस्ते त्यांना पीएचडी पदवी बहाल करीत त्यांचा सन्मान करण्यात आला. याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनीसुद्धा त्यांना शुभेच्छा दिल्या. 

मनीष वासमवार हे मूळचे गोंडपिपरी तालुक्यातील गणेशपिपरी येथील रहिवासी आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सक्रिय राजकारणात आहेत. विविध सामाजिक कार्यात ते वेळोवेळी सहभाग घेतात. गोंडपिपरी येथे त्यांची वासमवार पॅथोलॉजी आहे. ती पॅथॉलॉजी ते स्वतःच सांभाळतात. जीवशास्त्रात एमएससी पूर्ण केल्यानंतर त्यांनी पीएचडीचे स्वप्न पाहिले. पण एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या असल्याने ते कठीण वाटले. त्यांनी मागील अडीच वर्ष गोंडपिपरी पंचायत समितीचे उपसभापती पद सांभाळले. ते आता सदस्य आहेत.

सक्रिय राजकारण व इतर अनेक क्षेत्र सांभाळून त्यांनी आपली जिद्द  पूर्ण करण्याचे ठरविले. अन् सहा वर्ष अथक परिश्रम करून सूक्ष्म जीवशास्त्र या विषयात पीएचडी पूर्ण केली. नुकताच गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठात झालेल्या एका कार्यक्रमात विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी यांच्या हस्ते पीएचडी बहाल करण्यात आली. डॉ. मनीष वासमवार यांनी आपल्या यशाचे श्रेय सरदार पटेल महाविद्यालयाच्या सूक्ष्म जीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विजय वाढई, डॉ. गोकूल गोंड यांना दिले आहे. सक्रिय राजकारण, पॅथॉलॉजी व समाजकारण करतानाच आपली जिद्द कायम ठेवून सातत्यपूर्ण प्रयत्नांनी पीएचडी पूर्ण केल्याबद्दल अनेकांनी वासमवार यांचे अभिनंदन केले.

राज्यपालाकडूनही शुभेच्छा...
नुकताच गोंडवाना विद्यापीठाचा आठवा दीक्षांत समारंभ पार पडला. याप्रसंगी राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी मार्गदर्शनही केले. सोबत यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com