Sarkarnama
Sarkarnama

ZP निवडणुकीमुळे विरोधक धास्तावले, म्हणून केली तडीपारीची कारवाई…

ही माझी तडीपारी नसून सामाजिक कार्याची तडीपारी आहे. प्रशासनाने राजकीय दबावात हा प्रस्ताव केला आहे. भंडारा-गोंदिया विधान परिषदेचे आमदार परिणय फुके यांच्या नेतृत्वाखाली पक्ष जिल्ह्यात चांगली कामे करीत आहे.

भंडारा : जिल्हा परिषदेची निवडणूक जवळच आली आहे आणि या निवडणुकीसाठी मी उमेदवारी मागितली आहे. माझे गाव रोहा आणि परिसरात मी समाजहिताची अनेक कामे केली आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांनी धास्ती घेतली आणि कटकारस्थान रचून मला तडीपार केले, असे विश्‍वनाथ बांडेबूचे म्हणाले. Opposition frightened by zp elections so took action.

भारतीय जनता पक्षाच्या मोहाडी पंचायत समितीच्या माजी सभापतीच पतीदेव आणि भाजपचे पदाधिकारी असलेले विश्‍वनाथ बांडेबूचे यांच्यावर नुकतीच तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. त्यावर त्यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली. ते म्हणतात, ३ दिवसांपूर्वी मला जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा आदेश काढण्यात आला. हो विरोधकांचे कटकारस्थान आहे. कारण विविध समाजोपयोगी कामांतून जिल्ह्यात माझी ओळख निर्माण केली आहे. विरोधकांनी नेमकी हीच बाब खुपत आहे. कबड्डी, कुस्तीचे सामने, दंडार, विविध नाटके सादर करून जनजागृतीची कामे केली आहेत. ती यापुढे करीत राहणारच आहे. पण विरोधकांना या कारस्थानाचे जशास तसे उत्तर देणार आहे. 

ही माझी तडीपारी नसून सामाजिक कार्याची तडीपारी आहे. प्रशासनाने राजकीय दबावात हा प्रस्ताव केला आहे. भंडारा-गोंदिया विधान परिषदेचे आमदार परिणय फुके यांच्या नेतृत्वाखाली पक्ष जिल्ह्यात चांगली कामे करीत आहे. सरकारच्या योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे काम केले जात आहे. लोक आमच्यासोबत मोठ्या संख्येने जुळू लागले आहेत. त्यामुळे विरोधकांच्या पोटात दुखू लागले आहे. तडीपारीचा प्रस्ताव आणण्याच्या अगोदरही विविध माध्यमांतून मला छळण्याचे प्रयत्न झाले. पण मी त्यांना घाबरलो नाही. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली, असे बांडेबूचे यांनी सांगितले. 

जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे काम बघून जिल्ह्यातील अनेक मोठ्या नेत्यांच्या पोटात दुखायला लागले आहे. माझ्या विरोधात काही खोट्या एफआयआरदेखील दाखल करण्यात आल्या. न घाबरता त्याचाही सामना केला आणि न्यायालयाने सर्व दाखल गुन्ह्यांमध्ये माझी निर्दोष मुक्तता केली. त्यामुळेच विरोधकांचा जळफळाट झाला आणि कारस्थाने रचून तडीपारीची कारवाई त्यांनी घडवून आणली. या कारवाईनेही मी घाबरणार नाही, तर नव्या पिढीला चांगली दिशा मिळावी, यासाठी सतत कार्य करत राहणार आहे. 

भाजप सोडण्यासाठी दबाव...
तुम्ही आमच्या पक्षात या, आम्ही तुमची लाइफ सेट करून देऊ, असे आमिष मला जिल्ह्यातील काही बड्या नेत्यांनी दाखवले. पण त्यांच्या आमिषाला बळी पडलो नाही आणि आमदार परिणय फुके यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून सामाजिक कार्य करीत राहिलो. ही बाब विरोधकांना रुचली नाही. त्यामुळे त्यांनी हा कारभार केला. पण लवकरच सत्य लोकांसमोर येईल, आणि मी पुन्हा सामाजिक कार्यात सक्रिय होईल, असेही विश्‍वनाथ बांडेबुचे म्हणाले. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com