एका महाराजाने आमदार गायकवाडांची केली पाठराखण, तर इतरांची पोलिसांत तक्रार...

झालेल्या प्रकाराबद्दल राजकीय दबावापोटी जर संजय गायकवाड यांच्यावर त्वरित दाखल गुन्हा करण्यात आला नाही, तर आम्ही न्यायालयामध्ये धाव घेऊन प्रायव्हेट केस दाखल करणार आहोत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जातीने लक्ष घालावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
एका महाराजाने आमदार गायकवाडांची केली पाठराखण, तर इतरांची पोलिसांत तक्रार...
Sanjay Gaikwak MLA Buldana

अकोला : बुलडाणा जिल्ह्यातील आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी वृत्तपत्रांच्या माध्यमातून (Through newspapers) हिंदू धर्मीयांना आवाहन केले होते की, आपण उपास-तापास करू नका. आता तुमच्या कामात देवही येणार नाही. कारण की देवाने आपला दरवाजा बंद केलेला आहे. (God has closed our door) म्हणून मांसाहार करा. जर आपण मांसाहार केला तर कोरोना पॉझिटिव्हचे प्रमाण कमी राहील. कारण की मुस्लिम समाजामध्ये मांसाहार जास्त प्रमाणात केला जातो. (Meat is widely eaten in Muslim society) म्हणून मुस्लिम समाजामध्ये कोरोना पॉझिटिव्ह पेशंट कमी आहेत. त्यांच्या या वक्तव्यावर वारकऱ्यांना आक्षेप घेतला होता आणि आता थेट पोलिसांत तक्रार केली आहे. Reported directly to the police

काल प्रशांत महाराज दहीकर यांनी वारकऱ्यांना या वादावर पडदा टाकण्याचे आवाहन केले होते. आमदार गायकवाड यांच्यासोबत माध्यमांसमोर येऊन त्यांनी हा वाद पुढे न वाढविण्याची विनंती वारकरी समुदायाला केली होती. त्यानंतर हा वाद आता येथे संपला, असे समजले जात होते. पण आज वारकऱ्यांना पोलिसांत आणि तहसीलदारांकडे तक्रार केल्याने हे प्रकरण आणखी चिघळणार, असे बोलले जात आहे. उपरोक्त विधान करीत असताना आमदारांनी कोणत्याही वैद्यकीय अधिकाऱ्याचा दाखला दिलेला नाही. 

वारकऱ्यांनी सांगितले की, १३ मे रोजी एका वृत्तवाहिनीवर बातमी आलेली आहे. त्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की, मांसाहार करणाऱ्या मंडळीमध्ये कोरोना पॉझिटिव्हचे प्रमाण कमी आहे आणि म्हणून संजय गायकवाड यांच्या विधानामुळे सनातन हिंदू धर्मामध्ये उपवास करणारी मंडळी मांसाहाराकडे वळवण्याचा गायकवाडांचा प्रयत्न आहे. त्यामुळे वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या. पण संजय गायकवाड यांनी असे विधान का केले? हे कोणत्या वैद्यकीय सल्ल्याच्या आधारे केले का, ही विचारणा करण्याकरिता महाराष्ट्रातून बऱ्याच महाराज मंडळींनी आमदार संजय गायकवाड यांना फोन केला असता संजय गायकवाड यांनी उर्मटपणाने बोलायला सुरुवात केली. 

गजानन महाराज दहिकर, अच्युत महाराज बोराडे, प्रकाश महाराज पांडे आणि इतरही बऱ्याच महाराज मंडळींसोबत अतिशय खालच्या दर्जाची भाषा त्यांनी वापरली. काही महाराज मंडळींना आई-बहिणीवर शिवीगाळ केली तर कुणाला धर्माबद्दल बोलायला सुरुवात केली. एवढंच नाही तर मी देवधर्म काही मानत नाही. देवाचा चमत्कार असता तर कोरोना आलाच नसता, असेही विधान केले. वारकऱ्यांनी झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागायची विनंती केली असता, माझं काही चुकलं नाही, मी माफी मागणार नाही, असे विधान संजय गायकवाड यांनी केले. संजय गायकवाड यांच्या बाजूने आतापर्यंत शिवसेनेच्या एकाही आमदाराने प्रतिक्रिया दिलेली नाही. उलट काही आमदार तर सरळ बोलले आमदार संजय गायकवाड यांनी वारकऱ्यांसोबत असे बोलायला नको होते. त्या सर्व शिवसेनेच्या आमदारांचे आम्ही विश्व वारकरी सेनेच्या वतीने जाहीर आभार मानतो, असे वारकरी म्हणाले. 

एवढेच नाही तर बुलडाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांना सदर प्रकार सांगितला असता, ते म्हणाले, आमदार संजय गायकवाड यांनी वारकऱ्यांसोबत असे बोलणे योग्य नाही. महाराष्ट्रामध्ये संत परंपरा आहे आणि सर्व राजकीय मंडळी आम्ही महाराष्ट्रातील संतांचा आदर करतो. मी स्वतः आमदार संजय गायकवाड यांना सांगितले झालेल्या प्रकाराबद्दल संत मंडळीची माफी मागा. त्यामध्ये आपला काहीही कमीपणा नाही. पण शेवटी आता त्यांची मर्जी आहे, असे वक्तव्य खासदार प्रतापराव जाधव यांनी केल्याचे वारकऱ्यांनी सांगितले. पण संजय गायकवाड हे कोणाचेही ऐकण्याकरिता तयार नाहीत आणि वारंवार महाराज मंडळींना शिवीगाळ करणे धमक्या देणे सुरूच असल्यामुळे आम्ही अकोट तहसील कार्यालय, अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये संजय गायकवाड यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

या तक्रारीची दखल प्रशासनाने त्वरित घेऊन संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करावी, अशी प्रशासनाला विनंती करण्यात येत आहे. सदर प्रकरणाची माहिती मेलद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आली आहे. स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे वारकरी संप्रदायाचा आदर करणारे होते. त्याच अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांना समज देऊन वारकऱ्यांची जाहीर माफी मागायला सांगतील, अशी अपेक्षा वारकऱ्यांनी व्यक्त केली. वारकऱ्यांचा अपमान करणाऱ्या संजय गायकवाड यांना शिवसेनेने पुन्हा उमेदवारी देऊ नये, अशीही विनंती करण्यात आली आहे.. 

झालेल्या प्रकाराबद्दल राजकीय दबावापोटी जर संजय गायकवाड यांच्यावर त्वरित दाखल गुन्हा करण्यात आला नाही, तर आम्ही न्यायालयामध्ये धाव घेऊन प्रायव्हेट केस दाखल करणार आहोत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जातीने लक्ष घालावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तहसील कार्यालय व पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल देताना. ह.भ.प. गणेश महाराज शेटे, अच्युत महाराज बोराडे, ज्ञानेश्वर महाराज पातोंड, प्रकाश महाराज पांडे, सोपान महाराज ऊकर्डे, श्रीधर महाराज तळोकर, विक्रम महाराज शेटे ही वारकरी मंडळी उपस्थित होती. उद्यापासून महाराष्ट्रात इतरही वारकरी संघटना आपापल्या परीने तहसील कार्यालयांमध्ये आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात तक्रार दाखल करणार असल्याची माहिती वारकऱ्यांनी दिली. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in