नाही कोणाशी वादावादी, आता आम्ही राष्ट्रवादी... - not arguing witn anyone now we are nationalist | Politics Marathi News - Sarkarnama

नाही कोणाशी वादावादी, आता आम्ही राष्ट्रवादी...

राजेश चरपे
रविवार, 7 फेब्रुवारी 2021

विदर्भात विस्तारासाठी राष्ट्रवादीचे जोमाने प्रयत्न सुरू आहेत. दोन महिन्यांपासून गृहमंत्री अनिल देशमुख आणि प्रफुल पटेल प्रमुख कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन गाठीभेटी घेत आहेत. त्यांचे मनोगत जाणून घेत आहेत. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष तसेच जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रम हाती घेतला.

नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री आज शहरात दाखल होत आहेत. नगरसेविका आभा पांडे आज राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. आभा पांडे मूळच्या काँग्रेसच्या आहेत. काँग्रेसच्या नगरसेविका असताना त्या स्थायी समितीच्या अध्यक्ष होत्या. मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातून विधानसभेच्या निवडणुकीत बंडखोरीसुद्धा केली होता. चार वॉर्डाच्या प्रभागातून त्या अपक्ष निवडणूक आल्या आहेत. यावरून त्यांच्या मागे जनाधार असल्याचे स्पष्ट होते. त्यांच्या पक्षप्रवेशाचे मोठे फलक झळकत आहेत. त्यावरील ‘नाही कोणाशी वादावादी, आता आम्ही राष्ट्रवादी‘ हे घोषवाक्य चांगलेच चर्चेत आहे.

आजपासून राष्ट्रवादीची मेगा भरती 
राष्ट्रवादीच्या परिवार विस्तार कार्यक्रमाला यश येऊ लागले आहे. आजपासून अजित पवार यांच्या उपस्थितीत मेगा भरतीला सुरुवात होत आहे. नगरसेविका तसेच मनपा स्थायी समितीच्या माजी अध्यक्ष आभा पांडे यांच्या गृहप्रवेशापासून यास प्रारंभ होत आहे. अजित पवार आज नागपूरला दाखल होताहेत. आभा पांडे यांनी प्रवेशासाठी शांतीनगर चौकातील मुदलीयार लॉनमध्ये भव्य कार्यक्रम यासाठी आयोजित केला आहे. आपल्यासोबत मध्य-पूर्व नागपुरातील मोठी जनता प्रवेश करणार असल्याचा त्यांचा दावा आहे. सायंकाळी गणेशपेठ येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयात इतरांचा प्रवेश होणार आहे. या कार्यक्रमालाही अजित पवार, खासदार प्रफुल पटेल प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. यावेळी काही व्यापारी संघटना, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी व त्यांचे समर्थक प्रवेश करणार असल्याचे समजते. 

विदर्भात विस्तारासाठी राष्ट्रवादीचे जोमाने प्रयत्न सुरू आहेत. दोन महिन्यांपासून गृहमंत्री अनिल देशमुख आणि प्रफुल पटेल प्रमुख कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन गाठीभेटी घेत आहेत. त्यांचे मनोगत जाणून घेत आहेत. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष तसेच जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रम हाती घेतला. गडचिरोली जिल्ह्यापासून यास सुरुवात झाली. नागपूरमध्ये दोन दिवस ते तळ ठोकून होते. या दरम्यान भाजप, काँग्रेस, शिवसेनेचे नाराज असलेले अनेक आजी-माजी पदाधिकारी, नगरसेवकांची त्यांनी भेट घेतली. त्यात आभा पांडे यांचाही समावेश होता. त्या आज प्रवेश करीत आहेत. काही नगरसेवकांची तांत्रिक अडचण आहे. पक्षांतर बंदी कायद्यामुळे त्यांनी निवडणुकीपर्यंत थांबण्याचा निर्णय घेतला आहे. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख