निष्काळजी की अज्ञान : सर्वत्र लशींचा तुटवडा, पण गोंदियात ६ हजार डोस गेले वाया…

इतर जिल्ह्यांमध्ये लोक लस घ्यायला तयार आहेत, लसीकरण केंद्रांसमोर रांगा लावत आहेत. पण लसी उपलब्ध होत नाहीत आणि गोंदियात असा उलटा प्रकार घडल्यामुळे चीड व्यक्त केली जात आहे. प्रशासन सर्व स्तरांवर प्रयत्न करून लसींची उपलब्धता करण्याच्या प्रयत्नात आहे.
Covishield Vaccine
Covishield Vaccine

भंडारा : कोरोना महामारीशी दोन हात करण्यासाठी सर्व स्तरांतून प्रयत्न केले जात आहे. त्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. (Emphasis is being placed on vaccination) पण राज्यभर लसींचा तुटवडा निर्माण झाला. (There was a shortage of vaccines) पण गोंदियामध्ये लशींचे ६ हजार ५७डोस वाया गेल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. लसीकरणासाठी लोक वेळेवर न पोहोचल्याने (Because people did not arrive on time for vaccinations) हे डोस वाया गेल्याचे सांगण्यात येत आहे. 

गोंदिया शहरासह जिल्ह्यात लसीकरणासाठी नागरिकांची नोंदणी करण्यात आली होती. आरोग्य कर्मचारी, शिक्षक आदींनी घरोघरी जाऊन हे काम केले. त्याचे अहवाल प्रशासनाला सादर केले. कर्मचारी घरपोच आल्यामुळे नागरिकांना नोंदणी तर केली, पण लसीकरणाकडे पूर्णपणे पाठ फिरवली. यामध्ये ग्रामीण भागातील लोकांची संख्या जास्त आहे. आरोग्य विभागासह शिक्षकांनी आपला जीव धोक्यात घालून नागरिकांच्या लसीकरणासाठी सर्वे केला. पण लोकांनीच लसीकरणाला प्रतिसाद न दिल्याने ६ हजार ५७ डोससह शेकडो कर्मचाऱ्यांनी मेहनतसुद्धा वाया गेली आहे. 

ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये अद्यापही लसीकरणाबाबत अनेक गैरसमज असल्याने ते लसीकरणासाठी केंद्रावर पोहोचत नसल्याचे चित्र आहे. परिणामी मोठ्या प्रमाणात लसींचे डोस वाया जात आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 6057 डोस वाया गेले असून यात 3.18 टक्के आहे. यात कोविशिल्डचे 2741 (4.32) टक्के व कोव्हॅक्सिनचे 3300 डोस वाया गेले आहेत. हे डोस वाया गेले नसते तर एका गावातील नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असते. सध्या सर्व लसींचा तुटवडा आहे,अशात मोठ्या प्रमाणात डोस वाया जात असल्याचे काम करावे कसे, हा प्रश्‍न प्रशासनातील लोकांना पडला आहे. 

इतर जिल्ह्यांमध्ये लोक लस घ्यायला तयार आहेत, लसीकरण केंद्रांसमोर रांगा लावत आहेत. पण लसी उपलब्ध होत नाहीत आणि गोंदियात असा उलटा प्रकार घडल्यामुळे चीड व्यक्त केली जात आहे. प्रशासन सर्व स्तरांवर प्रयत्न करून लसींची उपलब्धता करण्याच्या प्रयत्नात आहे. असे प्रकार झाल्यास वेळ, श्रम, पैसा यांची नासाडी होते. त्यामुळे आता गोंदिया जिल्ह्यात लसींची उपलब्धता करण्यापूर्वी लोकांमध्ये जागृती करावी, असा एक मतप्रवाह पुढे आला आहे. प्रशासनाने जनजागृतीची तयारी केली आहे. कारण काहीही झाले, लोक कितीही अज्ञानी असले तरी त्यांचे जीव वाचविण्याचे मोठे आवाहन सरकारसमोर आहे. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com