भाजपच्या ‘या’ नेत्याच्या विरोधात राष्ट्रवादीच्या महिला आघाडीने तापवले वातावरण

पीडित महिलेने प्रमोद डोंगरेकडून भूखंड १२ लाखांमध्ये खरेदीचा व्यवहार केला. परंतु तो भूखंड मुन्ना यादवला पसंत पडला. मुन्नाने आपला पंटर राजवीर यादव याच्या नावाने तो भूखंड प्रमोदकडून खरेदी करण्याचा सौदा केला. त्यामुळे वाद चिघळला.
Ncp Ladies
Ncp Ladies

नागपूर : महिलेचा भूखंड हडपणे भारतीय जनता पार्टीचे नेते आणि राज्याचे बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे माजी अध्यक्ष मुन्ना ऊर्फ ओमप्रकाश यादव यांच्या चांगलेच अंगलट आले. पोलिसांनी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केल्यानंतर यादव साथीदारांसह फरार झाला. नंतर काल त्याच्या घरासमोर राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ‘थाळी वाजवा’ आंदोलन करून आरोपी मुन्ना यादव व पंजू तोतवानीच्या अटकेची मागणी केली. 

या आंदोलनामुळे उपराजधानीतील वातावरण चांगलेच तापले आहे. आंदोलनात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी गुन्ह्याचा अभिलेख तपासून मुन्ना यादव व पंजू तोतवानी टोळीवर मोक्काचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मुन्ना यादव व कथित सामाजिक कार्यकर्ता पंजू तोतवानीसह पाच जणांवर ४० वर्षीय पीडित महिलेच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी भूखंड खरेदीच्या व्यवहारातून विनयभंग, धमकी देण्यासह अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच अटक टाळण्यासाठी मुन्ना हा टोळीसह फरार झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांचे विविध पथके आरोपींचा कसून शोध घेत आहेत. राजवीर यादव, गणेश यादव, प्रॉपर्टी डीलर प्रमोद डोंगरे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या टोळीतील इतर सदस्यांची नावे आहेत. तर याप्रकरणी आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

अटकेपासून वाचण्यासाठी फरार झालेल्या मुन्ना यादवसह टोळीला वेळीच अटक करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आज रस्त्यावर उतरल्या. त्यांनी बुधवारी थेट मुन्ना यादव यांचे घर गाठले आणि त्यांच्या घरासमोरच थाळी वाजवा आंदोलन करून अटकेची मागणी केली. सदर आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस शहर महिला आघाडीच्या अध्यक्षा लक्ष्मी सावरकर, नागपूर ग्रामीणच्या अध्यक्षा अर्चना हरडे यांच्या नेतृत्वात करण्यात आले. यावेळी राकाँच्या शहराच्या उपाध्यक्षा नूतन रेवतकर, प्रतिभा मेश्राम, भारती वानखेडे, रेखा कृपाले, सुनीता खत्री, सीमा चारभे, ज्योती मेश्राम, शशिकला बागडे प्रामुख्याने उपस्थित होत्या. यावेळी पोलिसांनी सर्व आंदोलनकर्त्या महिलांवर गुन्हे दाखल करून त्यांना ताब्यात घेतले.

असे आहे प्रकरण
झारखंड येथील सिनू नावाच्या व्यक्तीचा पांडुरंगनगर येथे भूखंड आहे. पीडित महिलेने प्रमोद डोंगरेकडून भूखंड १२ लाखांमध्ये खरेदीचा व्यवहार केला. परंतु तो भूखंड मुन्ना यादवला पसंत पडला. मुन्नाने आपला पंटर राजवीर यादव याच्या नावाने तो भूखंड प्रमोदकडून खरेदी करण्याचा सौदा केला. त्यामुळे वाद चिघळला. मुन्ना यादव याने पंजू तोतवानीला त्या महिलेचे तोंड बंद करण्यास सांगितले. पंजूने तिला गुंडाकरवी ईभ्रत लुटण्याची धमकी दिल्याची माहिती महिलेने पोलिसांनी दिली.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com