BUDGET 2021 : आता कामठी, हिंगणा आणि बुटीबोरीपर्यंत धावणार नागपूर मेट्रो

नागपूर मेट्रोचा विस्तार ऑटोमॅटीव्ह चौकातून पुढे कामठीपर्यंत, मिहानपासून पुढे बुटीबोरीपर्यंत तर लोकसेवानगरपासून पुढे हिंगणा या गावापर्यंत करण्यात येणार आहे.
Nagpur Metro
Nagpur Metro

नागपूर : केंद्रीय अर्थसंकल्प लोकसभेत सादर करण्यास काही वेळापूर्वीच सुरुवात झाली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पाचे वाचन करताना सुरूवातीलाच महाराष्ट्रासाठी एक मोठी घोषणा केली आहे. राज्यातील मेट्रो प्रकल्पांना बळ देणारी ही बातमी आहे. सीतारमण यांनी नाशिक आणि नागपूर मेट्रोसाठी मोठी आर्थिक तरतूद जाहीर केली आहे. नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या फेजसाठी ५ हजार ९७६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. 

देशात २०१४ मध्ये मोदी सरकार स्थापन झाले. त्यानंतर देशातील काही प्रमुख शहरांचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाला. त्यामध्ये दुसऱ्या टप्पात नागपूरचा क्रमांक लागला. माझी मेट्रो हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा नागपुरातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. ८ हजार ४०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला आजच्या बजेटमध्ये दुसऱ्या फेजसाठी फरी निधी मंजूर झाला आहे. यामध्ये नागपूर मेट्रोचा विस्तार ऑटोमॅटीव्ह चौकातून पुढे कामठीपर्यंत, मिहानपासून पुढे बुटीबोरीपर्यंत तर लोकसेवानगरपासून पुढे हिंगणा या गावापर्यंत करण्यात येणार आहे. केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या आजच्या घोषणेमुळे मेट्रोच्या कामांना अधिक गती मिळणार आहे. 

मागील बजेटमध्ये नागपूर मेट्रोसाठी ४०० कोटी रुपये देण्यात आले होते. नागपूर शहराची स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. नवनवीन प्रकल्प येथे येऊ घातले आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांतून नागपुरात मेट्रो आली. या प्रकल्पास सुरुवातीला विरोधकांकडून विरोध झाला. आता याच नागपूर मेट्रोसाठी आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात ५,९७६ हजार कोटींची घोषणा करण्यात आली. स्मार्ट सिटी प्रकल्प सुरू झाल्यानंतर काही वर्षांतच लोकसंख्याही वाढली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रयत्न व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने स्मार्ट सिटी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आकार घेत आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पाचा जास्तीत जास्त नागरिकांना फायदा व्हावा, या दृष्टीने आणखी काही बदल करण्याची आवश्यकता आहे. 

मेट्रोचे काम उत्तम आहे. ‘सेलीब्रेशन ऑन व्हील’ या उपक्रमाअंतर्गत मेट्रोला वाढदिवसांसारख्या कार्यक्रमांसाठी भाड्याने देण्याचा सल्ला मीच दिला होता. यातून गरीब लोकांना आनंदोत्सव साजरा करता यावा, हा हेतू आहे, असे परवा परवा गडकरी एका कार्यक्रमात म्हणाले होते.  

शहर बदलण्याचे श्रेय गडकरींना 
शहराचे आज जे चित्र बघायला मिळत आहे, त्याचे श्रेय केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या दूरदृष्टीला आहे. यापूर्वी रिंग रोडच्या दुरुस्तीसाठी दरवर्षी पैसा खर्च होत होता. परंतु, आता सिमेंट रस्त्यामुळे ५० वर्षे खड्डेच पडणार नाहीत. देशात सिमेंट रस्त्यांची संस्कृती गडकरी यांनीच रुजविली आहे.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com