BUDGET 2021 - मोदी सरकारचे ‘५ ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी’चे स्वप्न भंगले : डॉ. आशिष देशमुख

बंद असलेल्या किंवा मृतावस्थेत असलेल्या उद्योगांना पुनर्जिवित करण्यासाठी उपाययोजना,औद्योगिक गुंतवणूक, नवे उद्योग, जीडीपी दरातील उतार या समस्यांवरसुद्धा काहीच तोडगा अर्थसंकल्पात दिसत नाही. त्यामुळे ‘५ ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी’चे मोदी सरकारचे स्वप्न भंगले आहे.
Ashish Deshmukh
Ashish Deshmukh

नागपूर : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प सर्वसाधारण असाच आहे. आर्थिकदृष्ट्य़ा कमजोर असलेल्या वर्गाकडे या अर्थसंकल्पात साफ दुर्लक्ष करण्यात आले आहे. हा अर्थसंकल्प बेरोजगार आणि उद्योगधंद्यांना मारक असल्याची टिका काटोल विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि कॉंग्रेस नेते डॉ. आशिष देशमुख यांनी केली. 

कोरोनाच्या महामारीनंतर बेरोजगारी, व्यापार, शेतकऱ्यांच्या समस्या, आर्थिक मंदी, उद्योगांमध्ये आर्थिक गुंतवणूक, आरोग्य, महागाई व पेट्रोलजन्य पदार्थांच्या किमतीत सतत होणारी वाढ  या देशातील प्रमुख समस्यांना उग्र रूप धारण केले आहे. कोरोनामुळे अनेक उद्योगधंदे बंद झाले, लाखो लोकांच्या हातचा रोजगार गेला. या समस्यांवर मात करण्यासाठी अर्थमंत्र्यांनी काहीच ठोस उपाययोजना अर्थसंकल्पात केल्या नाहीत. हा सर्वसाधारण अर्थसंकल्प असल्याचे दिसत आहे. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सवलतींमध्ये वाढ करणे गरजेचे होते, त्या करण्यात आल्या नाहीत. एकुणच काय तर सर्वसामान्यांच्या अपेक्षांना पाने पुसणारा हा अर्थसंकल्प आहे. 

आर्थिकदृष्ट्य़ा कमजोर वर्गाला सरकारने दुर्लक्षित केले आहे. सद्यःस्थितीत देशात मागील ४५ वर्षात सर्वांत जास्त बेरोजगारी गेल्या वर्षी वाढली आहे. त्यामुळे  युवक-युवतींना रोजगारासाठी भटकंती करावी लागत आहे आणि भविष्यातही करावी लागेल, असे चित्र निर्माण झाले आहे. बंद असलेल्या किंवा मृतावस्थेत असलेल्या उद्योगांना पुनर्जिवित करण्यासाठी उपाययोजना,औद्योगिक गुंतवणूक, नवे उद्योग, जीडीपी दरातील उतार या समस्यांवरसुद्धा काहीच तोडगा अर्थसंकल्पात दिसत नाही. त्यामुळे ‘५ ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी’चे मोदी सरकारचे स्वप्न भंगले आहे.बेरोजगारी व उद्योगधंद्यांना मारक असा हा अर्थसंकल्प आहे, असे डॉ. देशमुख म्हणाले. 

सविस्तर अभ्यासाअंती असे लक्षात आले की, हा अर्थसंकल्प निराशाजनक आहे. पाच राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे. सर्वसामान्यांना सवलती मिळतील, अशी कुठलीही तरतूद करण्यात आली नाही. सरकारी कंपन्या विकण्याचा घाट सरकारने घातला आहे. या अर्थसंकल्पामुळे गरीब अधिक गरीब होत जाईल आणि श्रीमंत अधिक श्रीमंत होतील. एकंदरीत सर्वसामान्यांना निराश करणारा हा अर्थसंकल्प असल्याचे डॉ. आशिष देशमुख म्हणाले. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com