पळापळीत आमदार रायमुलकर झाले जखमी, अन् गावकऱ्यांनी घेतली पीएचसीकडे धाव...

केंद्राची पाहणी केल्यानंतर संजय रायमुलकर हे काही आरोग्यसेविकांना ऑस्किजन सिंलेडरबाबत माहिती देत होते. याचदरम्यान सिलेंडरमधील पाईप निघाला. गॅस लिक झाल्याने उपस्थितांची पळापळ झाली.
Sanjay Raymulkar
Sanjay Raymulkar

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : पंचायत राज कमिटी सध्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर आली आहे. जिल्ह्यातील विविध विभागांना भेट देऊन ते कारभाराची पहाणी करीत आहेत. ही टिम आज गोंडपिपरीच्या दौऱ्यावर होती. कमिटीचे अध्यक्ष आमदार संजय रायमुलकर हे आक्सापूरच्या पीएचसीमधील ऑक्सिजन सिलेंडरची तपासणी करित होते. दरम्यान सिलेंडरचा पाईप निघल्याने गॅस लिक झाला. त्यानंतर तेथे एकच पळापळ झाली. या पळापळीत रायमुलकर जखमी झाले. त्याच्या हाताला जखम झाली. 

आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान सिलेंडरच्या स्फोटात पंचायत राज कमिटीचे अध्यक्ष आमदार संजय रायमुलकर जखमी, अशी वार्ता जिकडेतिकडे पसरली. त्यामुळे काही वेळ जिल्हा प्रशासनाची धावाधाव झाली. पण नंतर सिलेंडरचा स्फोट नव्हे, तर सिलेंडरचा गॅस लिक झाल्याने झालेल्या धावपळीत ते किरकोळ जखमी झाल्याची माहिती पुढे आली. त्यानंतर यंत्रणेने निश्‍वास टाकला. पंचायत राजची टिम सध्या चंद्रपूर जिल्ह्याच्या दोऱ्यावर आहे. आज टिम गोंडपिपरी तालुक्यात पोहचली. टिमचे प्रमुख आमदार संजय रायमुलकर यांच्यासह संपुर्ण चमुने तालुक्यातील आक्सापूर प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. या केंद्राची पाहणी केल्यानंतर संजय रायमुलकर हे काही आरोग्यसेविकांना ऑस्किजन सिंलेडरबाबत माहिती देत होते. याचदरम्यान सिलेंडरमधील पाईप निघाला. गॅस लिक झाल्याने उपस्थितांची पळापळ झाली. त्यात रायमुलकर यांच्या हाताला किरकोळ मार लागला. यावेळी त्यांच्यासोबत चमुसह जिल्हयाचे मुख्य कार्यपालन अधिकारी राहूल कर्डीले होते.

गावकरी धावले..
सिलेंडरमधून गॅस लिक झाल्याची माहिती मिळताच आक्सापूरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. रायमुलकर यांना झालेली जखम किरकोळ स्वरूपाची असल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आला. आक्सापूर येथे डॉ. तेलकापल्लीवार पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. पण ते एकही दिवस कार्यालयात उपस्थित रहात नसल्याची तक्रार गावकऱ्यांनी केली. या तक्रारीची पंचायत राजच्या टिमने गंभीर दखल घेत चैकशी करून कार्यवाहीचे आश्वासन दिले.     Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com