आमदार पडळकर अद्याप ‘वंचितच’, भाजप नेत्यांनी सोडले वाऱ्यावर...

प्रत्यक्षात पत्रकार परिषदेला भाजपचा एकही पदाधिकारी उपस्थित नव्हता. त्यांच्या पत्रकार परिषदेची माहितीसुद्धा भाजपच्यावतीने प्रसिद्धी माध्यमांना दिली नाही. त्यामुळे पडळकर भाजपचे आमदार असले तर फडणवीस यांच्या शहरातील पदाधिकाऱ्यांनी त्यांना एकटे सोडल्याचे आज दिसून आले.
Gopichand PadalkarGopichand Padalkar
Gopichand PadalkarGopichand Padalkar

नागपूर : वंचित बहूजन आघाडीला सोडचिठ्ठी देऊन भाजपात येऊन आमदार झालेले माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक गोपिचंद पडळकर यांना भाजपने अद्यापही मनापासून स्वीकारल्याचे दिसून येत नाही. आज ते नागपूरला आले होते. त्यांनी पत्रकार परिषदसुद्धा घेतली. मात्र त्यांच्या कार्यक्रमाला भाजपचा एकही पदाधिकारी उपस्थित नव्हता. 

पडळकर यांनी वंचित बहुजन आघाडीतर्फे लोकसभा निवडणूक लढविली होती. त्यांनी पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात दंड थोपाटले होते. पुण्यात पवार कुटुंबीयांच्या वर्चस्वाला धक्का आणि रासपचे महादेव जानकर यांना शह देण्यासाठी पडळकर यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. त्यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात लढण्यासाठी तयार करण्यात आले. पडळकर धनगर समाजाचे प्रतिनिधित्व करतात. पराभव झाल्यानंतर फडणवीस यांनी त्यांना विधान परिषदेवर पाठविले. 

धनगर आरक्षणाच्या आंदोलनाला शांत करण्यासाठी भाजपने पडळकरांना पक्षात घेऊन नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता. राज्यात सत्तापालट झाली. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आहे. मात्र धनगर आरक्षणाचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. सोबतच मराठा आणि ओबीसींमध्ये आरक्षणावरून वाद सुरू आहे. ओबीसींची बाजू मांडण्यासाठी पडळकर नागपूरला आले होते. त्यांच्यासोबत भाजपचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहतील, अशी अपेक्षा सर्वांना होती. मात्र प्रत्यक्षात पत्रकार परिषदेला भाजपचा एकही पदाधिकारी उपस्थित नव्हता. त्यांच्या पत्रकार परिषदेची माहितीसुद्धा भाजपच्यावतीने प्रसिद्धी माध्यमांना दिली नाही. त्यामुळे पडळकर भाजपचे आमदार असले तर फडणवीस यांच्या शहरातील पदाधिकाऱ्यांनी त्यांना एकटे सोडल्याचे आज दिसून आले. 

पडळकर धनगर समाजाचे नेते आहेत. शहारत अनेक ओबीसी नेते आहेत. त्यांना वगळून पडळकर ओबीसींचे प्रश्न मांडणार असल्याने अनेक नेत्यांनी पाठ फिरवली असावी, अशी शक्यता वर्तविली जात आहे. विशेष म्हणजे धनगर समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी नितीन गडकरी यांचे कट्टर समर्थक खासदार विकास महात्मे हेसुद्धा आहेत. ते सातत्याने आरक्षणासाठी पाठपुरावा करीत असतात. उगाच गडकरी यांची नाराजी नको म्हणून शहरातील भाजपचे पदाधिकारी पडाळकर यांच्या पत्रकार परिषदेपासून लांब राहिले असावे, असाही तर्क लावला जात आहे.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com