मंत्र्याच्या गर्ल फ्रेन्डची आत्महत्या : संशयाचं वर्तूळ पोलिसांनी दाबू नये... - ministers girlfriends suicide police should not suppress the circle of suspicion | Politics Marathi News - Sarkarnama

मंत्र्याच्या गर्ल फ्रेन्डची आत्महत्या : संशयाचं वर्तूळ पोलिसांनी दाबू नये...

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 11 फेब्रुवारी 2021

पुण्यातील वानवडी भागात पूजा चव्हाण नावाच्या 23 वर्षांच्या तरुणीने रविवारी (७ फेब्रुवारी) रात्री इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. मूळची बीड जिल्ह्यातील असलेली पूजा दोन मुलांसोबत वानवडी भागात फ्लॅटमध्ये राहत होती. रविवारी रात्री मित्रांसोबत पार्टी केल्यानंतर तिने इमारतीवरून उडी मारली होती.

नागपूर : पुणे येथे पुजा चव्हाण नामक तरुणीने रविवारी मध्यरात्रीनंतर आत्महत्या केली. ती तरुणी विदर्भातील एका मंत्र्याची गर्ल फ्रेन्ड असल्याची जोरदार चर्चा राज्यभर पसरली. काल हे प्रकरण शांत झाले असे वाटत होते. पण आज भारतीय जनता पक्षाने या प्रकरणात सखोल चौकशीची मागणी केली. त्या तरुणीच्या मृत्यूभोवती संशयाचे वर्तूळ निर्माण झाले आहे, ते दाबण्याचा प्रयत्न कुणीही करू नये, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज पुणे येथे पत्रकार परिषदेत म्हणाले. 

फडणवीस म्हणाले, आज या संदर्भातली बातमी मी वाचली आहे. या बातमीमुळे हे प्रकरण अत्यंत गंभीर होत आहे. तो मंत्री आणि मृत तरुणी यांच्याबाबत समाजमाध्यमांमध्ये काही क्लिप्स फिरत आहेत, असेही मला सांगण्यात आले आहे. पुणे पोलिसांनी तात्काळ याची चौकशी केली पाहिजे. प्रकरणातील सत्य काय आहे, हे जनतेसमोर आणले पाहिजे. तरुणीची अशा प्रकारे झालेली आत्महत्या आणि त्याभोवती झालेले संशयाचे जे वर्तूळ आहे, ते दाबण्याचा प्रयत्न कुणी करू नये. यापूर्वी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी आडवळणाने त्या मंत्र्याचे नाव घेऊन खळबळ उडवून दिली. तर मृत तरुणी माझ्या मतदारसंघातील आहे. तिच्या आत्महत्येची सखोल चौकशी करण्याची मागणी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केली आहे. एकूणच काय तर या प्रकरणावर भारतीय जनता पक्ष गंभीर झाला आहे.

महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्र्यांपासूनच महिलांना धोका आहे. कोणी बलात्काराची तक्रार करते, तर कोणी आपली मुलं मंत्र्यांनी पळविल्याची तक्रार करते. आता तर मंत्र्यांमुळे तरुणी आत्महत्या करायला लागल्या आहेत. यांच्या दबावामुळे नातेवाईक तक्रार करायला पुढे येत नाहीत. रक्षकच भक्षक बनले आहेत, असे सणसणीत आरोप भातखळकर यांनी केला. तसेच पुजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. 

पुण्यातील वानवडी भागात पूजा चव्हाण नावाच्या 23 वर्षांच्या तरुणीने रविवारी (७ फेब्रुवारी) रात्री इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. मूळची बीड जिल्ह्यातील असलेली पूजा दोन मुलांसोबत वानवडी भागात फ्लॅटमध्ये राहत होती. रविवारी रात्री मित्रांसोबत पार्टी केल्यानंतर तिने इमारतीवरून उडी मारली होती.

पूजा चव्हाण ही तरुणी काही दिवसांपूर्वीच पुण्यात इंग्लिश स्पिकिंग क्लाससाठी आली होती. तिच्या आत्महत्येनंतर तिचे आणि तिच्या मित्राचे राज्य सरकारच्या एका मंत्र्यांसोबतचे सार्वजनिक कार्यक्रमातले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे भाजपकडून पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, संबंधित मुलीचे भाजपच्या राज्य पातळीवरील नेत्यांसोबतचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या सर्व गोष्टीमुळे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील गूढ वाढले आहे.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख