मराठमोळे डॉक्टर अमोल देशमुख करणार ‘बंगाल टायगर’वर स्वारी... - marathi doctor amol deshmukh will attack bangle tiger | Politics Marathi News - Sarkarnama

मराठमोळे डॉक्टर अमोल देशमुख करणार ‘बंगाल टायगर’वर स्वारी...

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021

रणजीत देशमुख यांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कॅबिनेटमध्ये कृषी मंत्रिपद सांभाळले आहे. काटोलचे आमदार डॉ. आशिष देशमुख यांचे ते लहान भाऊ आहेत.

नागपूर : पाच राज्यांमधील आगामी विधानसभा निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी कॉंग्रेस पक्ष सज्ज झाला आहे. निवडणूक रणनीतीचा एक भाग म्हणून कॉंग्रेसने प्रभारी नेतृत्वाची निवड केली आहे. पश्‍चिम बंगालचे निवडणूक प्रभारी म्हणून पक्षाने नागपुरातील कॉंग्रेस नेते डॉ. अमोल देशमुख यांची नियुक्ती केली आहे. डॉ. अमोल हे माजी मंत्री रणजीत देशमुख यांचे चिरंजीव आणि माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांचे लहान भाऊ आहेत. 

पश्चिम बंगालचा गड सर करण्यासाठी काँग्रेसने मराठमोळ्या शिलेदारावर जबाबदारी सोपवली आहे. डॉ. अमोल देशमुख हे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या संशोधन विभागाचे राष्ट्रीय समन्वयक आहेत. नागपुरात त्यांनी काँग्रेससाठी काम केलं आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी कॅबिनेट मंत्री रणजीत देशमुख यांचे ते पुत्र आहेत. रणजीत देशमुख यांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कॅबिनेटमध्ये कृषी मंत्रिपद सांभाळले आहे. काटोलचे आमदार डॉ. आशिष देशमुख यांचे ते लहान भाऊ आहेत. डॉ. आशिष नागपुरातील काटोल विधानसभा मतदारसंघातून आमदार होते. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत न पटल्याने त्यांनी भाजपला रामराम ठोकत फडणवीस यांच्याविरोधात निवडणूक लढवली. परंतु त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. सध्या ते काँग्रेसमध्येच आहेत.

२०१४ मध्ये लढवली होती विधानसभा निवडणूक
डॉ. अमोल देशमुख यांनी 2014 मध्ये विधानसभा निवडणूक लढवली होती. राष्ट्रवादीच्या तिकिटावर नागपूर जिल्ह्यातील रामटेक विधानसभा मतदारसंघातून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. पण त्यावेळी त्यांना अपयश आले. तेव्हा पराभव झाला असला तरी सामाजिक कार्याने ते रामटेक तालुक्यातील लोकांच्या लक्षात राहिले. व्यवसायाने डॉक्टर, पॅशनने मानवतावादी, तर निवडीने राजकारणी, अशी स्वतःची ओळख त्यांनी ट्विटरवर लिहिली आहे. 43 वर्षीय डॉ. अमोल देशमुख हे हेल्थकेअर एक्स्पर्ट आहेत. डॉ. देशमुखांनी पत्नी सुचेता गुप्ता यांच्या साथीने हर्ड फाउंडेशनची स्थापना केली आहे. 

कॉंग्रेसने अशा वाटल्या जबाबदाऱ्या-
राज्य - विधानसभा निवडणूक प्रभारी
केरळ - महेशमूर्ती लेणी एस जाधव
तामिळनाडू आणि पुद्दुचेरी - डॉ. हर्ष वर्धन श्याम
आसाम - आकाश सत्यवाली आणि गौरव कपूर
पश्चिम बंगाल - डॉ. अमोल देशमुख
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख