‘जेनेटिक’मधून रेमडेसिव्हिर निघाले बाजारात, गडकरींची ऑनलाइन उपस्थिती..

या इंजेक्शनची निर्मिती कारखान्यात सुरू झाल्यानंतर नितीन गडकरी यांनी या प्रकल्पाला भेट देऊन पूर्ण माहिती जाणून घेतली. निर्मितीची प्रक्रियाही त्यांनी पाहिली होती. सध्या या कंपनीत शंभर व्यक्ती कार्यरत आहेत.
Sarkarnama Banner
Sarkarnama Banner

वर्धा : कोरोना संसर्गाच्या काळात महत्वाचे औषध म्हणून रेमडेसिव्हीर (Remdisivir) आवश्यक झाले आहे. या औषधीचा तुटवडा निर्माण झाल्याने आलेले संकट दूर करण्याकरिता वर्ध्यातील सेवाग्राम येथील जेनेटिक लाईफ सायन्स (Jenetic Life Sciences) या कंपनीने हे औषध निर्माण करून त्याचा पुरवठा करणे सुरू केले. १७ हजार इंजेक्शनची पाहिली खेप (The first batch of 17,000 injections) काल, गुरुवारी बाजारात रवाना झाली. केंद्रिय मंत्री नितीन गडकरींनी (Nitin Gadkari) जेनेटिकला रेमडेसिव्हिर इंजेक्शनची निमिर्ती करण्याची परवानगी मिळवून दिली होती. 

पहिल्या खेपेतील १७ हजार इंजेक्शनपैकी ९ हजार ६०० इंजेक्शन शासकीय विक्रेत्यांच्या माध्यमातून नागपूर येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात येणार असल्याची माहिती कंपनीचे संचालक डॉ. महेंद्र क्षीरसागर यांनी दिली. या खेपेच्या वितरणाच्या वेळी येथे औषधी निर्मितीकरिता प्रयत्नरत असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ऑनलाइन उपस्थिती होती. कोरोना काळात रेमडेसिव्हीर या औषधींचा तुटवडा निर्माण झाल्याने यावर काय तोडगा काढावा, यावर विचार सुरू असताना वर्ध्यातील जेनेटिक लाईफने ही औषधी निर्माण करण्याची तयारी दर्शवली. 

याची माहिती नितीन गडकरी यांना मिळताच त्यांनी याचा पाठपुरावा करून येथे औषधी निर्माण करण्याची परवानगी मिळवून दिली. या परवानगीनुसार ६ मे २०२० पासून येथे औषध निर्मिती सुरू झाली. या इंजेक्शनची निर्मिती कारखान्यात सुरू झाल्यानंतर नितीन गडकरी यांनी या प्रकल्पाला भेट देऊन पूर्ण माहिती जाणून घेतली. निर्मितीची प्रक्रियाही त्यांनी पाहिली होती. सध्या या कंपनीत शंभर व्यक्ती कार्यरत आहेत. आतापर्यंत एक लाख इंजेक्शनचे उत्पादन झाले आहे. इंजेक्शनचा हा साठा आता जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत नागपूर व राज्यात वितरित करण्यात येणार आहे. 

मुख्यमंत्र्यांना दिली माहिती 
नितीन गडकरी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या उत्पादनाचा पहिला साठा बाजारात आल्याची माहिती दिली. तसेच राज्यात योग्य नियोजन करून त्याचे वाटप करण्यासंदर्भात चर्चा केली. 

औषधाची गरज भासत असल्याने तत्काळ पहिली खेप पाठविण्यात आली आहे. यातील ९ हजार ६०० इंजेक्शन नागपूर येथील शासकीय रुग्णालयाला पाठविण्यात येणार आहे. 
- डॉ. महेंद्र क्षीरसागर, 
संचालक, जेनेटिक लाईफ सायन्स, सेवाग्राम, वर्धा.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com