विदर्भावर प्रेम नाही, असे म्हणणे चुकीचे...

विकास म्हणजे नक्की काय हे महाविकासआघाडीच्या सरकारने करून दाखवले आहे. मागील एका वर्षात नुकसान भरपाई म्हणून साडेतेरा हजार कोटी या सरकारने दिले. नागपूर आणि विदर्भात पर्यटक कसे आणायचे याची जबाबदारी सर्वांना घ्यायची आहे. वनराजधानीची सुरुवात नागपूरपासून होईल.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

नागपूर : माझे आजोळ अमरावती जिल्ह्यातील परतवाडा तालुक्यातील आहे. आमच्यात विदर्भाच रक्त आहे. आम्हाला विदर्भावर प्रेम नाही, असे म्हणणे चुकीचे आहे. ‘जे जे करणं शक्य असेल ते माझ्या नागपुरात करील’ असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. काल ‘बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान’चे उद्घाटन करण्यासाठी ते नागपुरात आले होते. 

मागील वीस ते पंचवीस दिवसांत माझा हा विदर्भातील तिसरा दौरा आहे. पहिल्यांदा गोसेखुर्दच्या पाहणीसाठी आलो होतो. त्याच्या दोन दिवसांनी भंडाऱ्यात पुन्हा आलो आणि आज पुन्हा आलो. त्यामुळे विदर्भाकडे आमचं लक्ष नाही, असं जर कुणी म्हणत असेल, तर ते चुकीचे आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. कार्यक्रमाला पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, सुनील केदार, संजय राठोड, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव विकास, महापौर दयाशंकर तिवारी, राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, खासदार कृपाल तुमाने, आमदार आशिष जयस्वाल, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, नागपूर महानगर विकास प्राधिकरणाच्या आयुक्त शीतल तेली-उगले, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, पोलिस अधीक्षक (ग्रामीण) राकेश ओला, डॉ. बसवराज तेली, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा आदींची उपस्थिती होती. 

सुरुवातीला गोसेखुर्द धरणाची पाहणी करण्यासाठी आलो होते. गोसेखुर्द पाहण्याची मनापासून इच्छा होती. गोसेखुर्दला भेट दिल्यानंतर अनेक गैरसमज दूर झाले. दोन दिवसांनी भंडाऱ्यातील रुग्णालयाला आग लागली. भेट देण्यासाठी पुन्हा यावं लागलं. आज ‘बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान’साठी आलो. महिनाभपापूर्वी अमरावती बाळासाहेब ठाकरे महामार्गाची पाहणी करण्यासाठी आलो होतो. 

माझे आजोळ अमरावती जिल्ह्यातील परतवाडा तालुक्यातील आहे. आमच्यात विदर्भाच रक्त आहे. आम्हाला विदर्भावर प्रेम नाही, असे म्हणणे चुकीचे आहे. ‘जे जे करणं शक्य असेल ते माझ्या नागपुरात करील’ असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. नागरिकांना आता पर्यावरणाचे महत्व समजू लागले आहे. याचा आनंद आहे. १ मे रोजी नागपूर ते शीर्डी समृद्धी मार्गाचे उद्घाटन करण्याचे ठरवले आहे, ते होईल, असेही ते म्हणाले. 

वनराजधानीची सुरुवात नागपूरपासून 
विकास म्हणजे नक्की काय हे महाविकासआघाडीच्या सरकारने करून दाखवले आहे. मागील एका वर्षात नुकसान भरपाई म्हणून साडेतेरा हजार कोटी या सरकारने दिले. नागपूर आणि विदर्भात पर्यटक कसे आणायचे याची जबाबदारी सर्वांना घ्यायची आहे. वनराजधानीची सुरुवात नागपूरपासून होईल, असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com